शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ येथे विद्युत तारांवर भरते पक्ष्यांची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 11:38 IST

Birds Yawatmal News  धामणगाव-यवतमाळ रस्त्यालगत मोहा फाटा नजीक चांदुरे कॉलोनी (शिक्षक कॉलोनी) आहे. सकाळी सुर्योदयादरम्यान विद्युत तारांवर सुमारे ५० ते ६० हजार एवढ्या संख्येत पक्ष्यांचा थवा असतो.

ठळक मुद्देगुरुजींच्या वस्तीत भल्या पहाटे हजारो पक्ष्यांची हजेरी   

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अशी पाखरे येती,आणिक स्मृती ठेवुनी जाती,दोन दिसांची रंगत संगत,दोन दिसांची नातीकवी मंगेश पाडगावकरांच्या या काव्याचा प्रत्यक्ष अनुभव सध्या यवतमाळमधील चांदुरे नगरातील शिक्षकांच्या वस्तीत भल्या पहाटे भरणाऱ्या पक्ष्यांच्या हजेरीहून पहायला मिळत आहे. हिवाळ्याची बोचरी थंडी आणि दीपावली सणाच्या आनंदोत्सव दरम्यान लालबुडी भिंगरी, मंदिर देवकन्हाई ( मस्जिद अबालील ) पक्ष्यांची शाळा बघून येथे येणाऱ्या पाहुण्यांचे सुद्धा डोळ्यांचे पारणे फिटत आहे.    धामणगाव-यवतमाळ रस्त्यालगत मोहा फाटा नजीक चांदुरे कॉलोनी (शिक्षक कॉलोनी) आहे. सकाळी सुर्योदयादरम्यान विद्युत तारांवर सुमारे ५० ते ६० हजार एवढ्या संख्येत पक्ष्यांचा थवा असतो. सकाळी अंदाजे २ तास पक्षांचा विहंगम नजारा पहायला मिळतो.अनेक पक्षीमित्र पक्षीनिरीक्षणासाठी दुरुवर भ्रमंती करतात पण घरबसल्या हे पक्षी पहायला मिळत असल्याने स्थानिक रहिवाश्यांना सुखद अनुभव मिळत आहे. या परिसरात आजूबाजूला ३ पानस्थळ जागा असून यामध्ये बोरगाव धरण, टाकळी तलाव, मोहा तलावाचा समावेश आहे. स्थानिक बोरगाव प्रकल्प येथे ८७ पक्षी,तर निळोना येथे ७२ पक्षी तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात एकूण ३४३ पक्ष्यांची नोंद पक्षीमित्रांनी पक्षीसप्ताह दरम्यान केली. यामध्ये अमेरिका,युरोप या खंडातील विविध प्रजांतीचे १०४ पक्ष्यांमध्ये स्थानिक स्थलांतर करणारे ग्रेटर फ्लेमिंगो आणि विदेशी स्थलांतरित पक्षी ब्लॅक टेल गॉडवीट आदींचा समावेश आहे.

सुखद आनंदानुभवहे पक्षी गेल्या आठ दिवसापासून अगदी भल्यापहाटे येतात.उन्ह कोवळे असेपर्यंत थांबतात व नंतर अचानक दिसेनासे होतात. गेल्या अनेक महिन्यापासून शाळा बंद आहे परंतु भल्या पहाटे घराभोवती होणारा पक्ष्यांचा किलबिलाट हा अनुभव खरचं खूप सुखद आनंदानुभव आहे. असे जिल्हा परिषद केंद्रीय शाळा वरदचे (पं.स.राळेगाव) मुख्याध्यापक मिलींद अंबलकर यांनी सांगितले.  

पक्ष्यांचे अचूक टायमिंगदेश विदेशातील विविध भागातील पक्षी स्थलांतर करून हिवाळ्यात आपल्याइकडे येतात. सकाळी आपल्या उदरनिर्वाहासाठी काही पक्षी गटागटाने परिसरात आठही दिशांना प्रस्थान करतात. त्यातील काही ५ किमी तर काही २०-२५ किलोपर्यंत उड्डाण भरतात. मग विविध दिशांना व विविध अंतरावर गेलेले पक्षी एकाच वेळेस व एकाच ठिकाणी कसे एकत्र येतात हा खरं तर आपल्या मानवांसाठी उत्स्कुतेचा व संशोधनाचा विषय असल्याचे राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य