लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निमा संघटनेच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने येथे सायकल रॅली काढण्यात आली. यातून डॉक्टरांनी आरोग्य रक्षणाचा संदेश दिला.सकाळी तिरंगा चौकातून सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. ही रॅली तिरंगा चौकातून हनुमान आखाडा, माळीपुरा, पाटीपुरा, शारदा चौक, जाजू चौक, दत्त चौक, गार्डन रोड, महाजन हॉल अशा पद्धतीने पुन्हा तिरंगा चौकात पोहोचली. या ठिकाणी धन्वंतरी पूजन करून रॅलीचा समारोप करण्यात आला. निमा (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन) संघटनेच्या ७१ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून रॅलीद्वारे नागरिकांना आरोग्य सांभाळण्याचे आवाहन करण्यात आले. त्यासोबतच बेटी बचाओ, पाणी वाचवा, झाडे लावा असा संदेश देण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण राखुंडे, सचिव डॉ. अमोल दिवाने, कोषाध्यक्ष डॉ. अतुल गुल्हाने, प्रकल्प संचालक डॉ. शैलेश यादव, डॉ. अतीश गजभिये, डॉ. आदित्य अढाउकर आदींसह यवतमाळ सायकलींग क्लबचे सदस्यही रॅलीत सहभागी झाले होते.
निमा संघटनेच्यावतीने सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 21:52 IST
निमा संघटनेच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने येथे सायकल रॅली काढण्यात आली. यातून डॉक्टरांनी आरोग्य रक्षणाचा संदेश दिला.
निमा संघटनेच्यावतीने सायकल रॅली
ठळक मुद्देस्थापना दिवस : आरोग्य जनजागृती, झाडे लावण्याचा संदेश