शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, 199 गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 05:00 IST

जलस्त्रोताच्या जवळ उकीरडे, गटाराचे सांडपाणी, संडासचा खड्डा असे गंभीर प्रकार आढळले आहे. यामुळे पाण्याचे स्रोत दूषित झाले आहे. अशा ठिकाणी ग्रामपंचायतीला आरोग्य विभागाने विविध उपाययोजना सांगितल्या आहे. यामध्ये जलस्त्रोताच्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर सारखे जलशुद्धीकरण करणाऱ्या औषधी वापरण्याच्या सूचना आहेत. तर काही ठिकाणी जलस्त्रोत बंद करण्याच्याही सूचना आहेत. 

ठळक मुद्देसाथरोग रोखण्याचे आव्हान : उपापयोजना करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीला निर्देश

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जलस्त्रोत तपासले जातात. यानंतर दूषित जलस्त्रोत असणाऱ्या ठिकाणी विविध उपाययोजना सूचविण्यात येतात. यामुळे साथरोगाला नियंत्रित करता येते. यावर्षी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १९९ गावांचे जलस्त्रोत दूषित असल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे आला आहे. एकूण नमुन्यांच्या तपासणीपैकी १० टक्के नमुने दूषित आहे. जलस्त्रोताच्या जवळ उकीरडे, गटाराचे सांडपाणी, संडासचा खड्डा असे गंभीर प्रकार आढळले आहे. यामुळे पाण्याचे स्रोत दूषित झाले आहे. अशा ठिकाणी ग्रामपंचायतीला आरोग्य विभागाने विविध उपाययोजना सांगितल्या आहे. यामध्ये जलस्त्रोताच्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर सारखे जलशुद्धीकरण करणाऱ्या औषधी वापरण्याच्या सूचना आहेत. तर काही ठिकाणी जलस्त्रोत बंद करण्याच्याही सूचना आहेत. कोरोना काळात जलस्त्रोत तपासणीचे काम गतवर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे. अशा ठिकाणी रोटेशन पद्धतीने पाण्याचे स्त्रोत तपासले जाणार आहे. या ठिकाणी पाणी दूषित आढळले तर खबरदारी घ्यावी लागणार आहे. 

कोरोनामुळे नमुने घटले- पावसाळ्यापूर्वी गावातील पेयजलाचे स्त्रोत आरोग्य विभागामार्फत तपासले जातात. कोरोनामुळे आरोग्याची संपूर्ण यंत्रणा कोविडच्या कामातच व्यस्त होती. परिणामी जलस्रोत तपासण्याचे काम प्रभावित झाले. निर्धारित उद्दिष्टांच्या मोजक्याच स्त्रोतांचा जलस्त्रोत तपासण्यात आला. - या नमुन्यांच्या तपासणीसाठी भूजल सर्वेक्षण विभागाची यंत्रणाही काम करीत असते. कोरोनामुळे एकूण उपस्थितीवर बंधने होती. यातून मोजकेच जलस्त्रोत तपासण्यात आले. जे जलस्त्रोत दूषित आढळले अशा ठिकाणी ग्रामपंचायतीला उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - जिल्हास्तरावर तपासणीसाठी आलेल्या नमुन्यांच्या अहवालानंतर ब्लिचिंग पावडर टाकण्याच्या सूचनाही ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहेत. 

ज्या गावांत तपासणीच झाली नाही त्यांचे काय?

ज्या गावांमध्ये पाण्याच्या नमुन्याची तपासणी झाली नाही, अशा ठिकाणी रोटेशन पद्धतीने दर महिन्याला पाण्याची तपासणी होणार आहे. यानुसार त्या ठिकाणी उपाययोजना पार पडतील. 

आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या !- पावसाळ्यात जलजन्य आजाराचे मोठ्या प्रमाणात थैमान होते. यातून साथरोग पसरु शकतो. आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी या काळात पाणी उकळून पिणे सर्वाधिक चांगले आहे. यामुळे पाण्यात आलेला बॅक्टेरिया नष्ट होतो. परिणामी पाण्यापासून उद्‌भवणारे आजार टाळता येतात. डायरिया, काॅलरा यामुळे व्यक्तींचे आरोग्य धोक्यात येते. शरिरातील संपूर्ण पाणी कमी होते. परिणामी शरीरातील खनिज द्रव्य कमी झाल्याने व्यक्ती आजारी पडतो. तो त्याच्या जीवावर बेतू शकतो.  

 

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्य