शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

नेर येथे बहुजन क्रांती मोर्चा

By admin | Updated: May 30, 2017 01:18 IST

बहुजनांच्या प्रश्नांना घेवून येथे बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : बहुजनांच्या प्रश्नांना घेवून येथे बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.देशात एससी, एसटी, ओबीसी, बारा बलुतेदार, व्हीजेएनटी, एलबीसी, अल्पसंख्यक, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध, लिंगायत यांच्या संवैधानिक हक्क अधिकारांसाठी एकच पर्व-बहुजन सर्व या संकल्पनेतून हा मोर्चा काढण्यात आला होता.तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे, अहल्याबाई होळकर यांच्या विचार प्रतिमांसह अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मोर्चाला सुरूवात झाली. विविध रंगाचे झेंडे आणि मागणी फलक घेवून नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.शेतकरी कर्जमाफी, ओबीसी गणना, व्हीजेएनटीलाही अ‍ॅट्रॉसिटी संरक्षण, आदिवासींसाठीची अनुसूची पाच व सहा लागू व्हावी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, निवडणुकीत इव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरचा वापर व्हावा, ब.मो. पुरंदरे यांना दिलेला पुरस्कार काढून घ्यावा, अल्पसंख्यकांसाठी कम्युनल राईट्स प्रोटेक्शन अ‍ॅक्ट बनविण्यात यावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला शरद मोरे, सुकलाल देशपांडे, तारिक सईद खान, अविनाश शेंडे आदींनी संबोधित केले. संचालन मोर्चाचे संयोजक अशोक खोब्रागडे, तर आभार सहसंयोजक विनायकराव भोयर यांनी मानले. तहसीलदारांना निवेदन देताना सुभाष गायकवाड, लक्ष्मण वानखडे, नीलेश वाहाने, वंदना मिसळे, रत्नमाला मिसळे, चंदा मिसळे, संघमित्रा गायकवाड, वासुदेव शेंडे, किशोर सांडे, सुनील गवई, रूपेश मिसळे, पंकज रंगारी, शुभम मिसळे, देवानंद ढोके, प्रमोद गायकवाड, विशाल गोंडाने आदी उपस्थित होते.