शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बदलीस पात्र शिक्षकांची जिल्हा परिषदेत भरली शाळा

By admin | Updated: May 19, 2016 02:03 IST

जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी बुधवारी एकच गर्दी झाली होती. शेकडो शिक्षक जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत यादी पाहण्यासाठी धडपडत होते.

तुंबळ गर्दी : ५४१० पात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध यवतमाळ : जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी बुधवारी एकच गर्दी झाली होती. शेकडो शिक्षक जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत यादी पाहण्यासाठी धडपडत होते. यामुळे येथे एकच गोंधळ उडाला होता. जणू जिल्हा परिषदेत बुधवारी शिक्षकांची शाळाच भरल्याचा भास होत होता. पेसा आणि नक्षलग्रस्त भागातील २३०० शिक्षक बदलीस पात्र आहेत. बुधवारी या सर्वच शिक्षकांना जिल्हा परिषदेत बोलावण्यात आले होते. यामुळे बदलीप्रक्रियेच्या यादीत नाव पाहण्यासाठी शिक्षकांची एकच तारांबळ उडाली. यातील ३४० शिक्षकांच्या बदलीचे निर्धारण करण्यात आले असून यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा मंगळवारी रात्री ३ पर्यंत जागी होती. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला मंगळवारी ६७ शिक्षकांची बदली झाली. बुधवारी पेसा आणि नक्षलग्रस्त भागातील शिक्षकांची बदलीप्रक्रिया राबविण्यात आली. याकरिता बदलीपात्र १९२४ सहाय्यक शिक्षकांची यादी सकाळी प्रसिध्द करण्यात आली. त्यानंतर बदली प्रक्रियेला प्रारंभ होऊन ३४० बदलीचे निर्धारण करण्यात आले. सायंकाळी ७.३० पर्यंत ८९ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. (शहर वार्ताहर)याद्या फाटल्या, व्यवस्था कोलमडलीजिल्हा परिषदेच्या तळ मजल्यावर भिंतीवर बदलीपात्र शिक्षकांची यादी लावण्यात आली होती. या यादीत आपले नाव आहे का हे पाहण्यासाठी एकच गर्दी झाली. त्यावेळी या याद्याही फाटल्या. त्यामुळे येथे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांना शिस्त शिकविणारी शिक्षक आज बदलीसाठी मात्र आज बेशिस्त झाले होते.