शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटीच्या कामांना बी-१ टेंडर कायम

By admin | Updated: July 5, 2017 00:10 IST

रस्ते, पुल, इमारतींच्या बांधकामांसाठी बी-२ टेंडरचा आग्रह धरणाऱ्या शासनाने अखेर एक पाऊल मागे येत ....

शासनाचे एक पाऊल मागे : कंत्राटदारांना नोंदणीही बंधनकारक लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रस्ते, पुल, इमारतींच्या बांधकामांसाठी बी-२ टेंडरचा आग्रह धरणाऱ्या शासनाने अखेर एक पाऊल मागे येत आपल्या जाचक अटी शिथील केल्या आहेत. यापुढे दीड कोटी रुपयापर्यंतच्या कामांसाठी बी-१ टेंडरच कायम राहणार आहे. शिवाय कंत्राटदाराला सार्वजनिक बांधकाम खात्याचे रजिस्ट्रेशनही बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यात टेंडरचे विविध प्रकार आहेत. बहुतांश कामे सहसा बी-१ टेंडरने (संपूर्ण कामाचा एकच दर) केली जातात. परंतु या वर्षीपासून शासनाने अचानक नव्या अटी लागू करताना सर्वच कामांसाठी बी-२ टेंडर (बांधकामातील अ‍ॅटमवाईज दर) बंधनकारक केले होते. बॅलन्सशीट दाखवा काम घ्या, बँक स्टेटमेंटच्या तीनपट मर्यादेची कामे मिळवा या सारख्या आॅफर दिल्या जात होत्या. कंत्राटदारच नव्हे तर बांधकाम खात्याच्या यंत्रणेसाठीही ही बाब डोकेदुखी ठरली होती. प्रत्यक्षात या पद्धतीने काम करणे सहज सोपे नसल्याचे लक्षात आल्यानंतर शासनाने एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता दीड कोटी रुपयापर्यंतच्या कामासाठी बी-१ ही जुनीच टेंडर पद्धत कायम राहणार आहे. त्यामुळे कंत्राटदार व यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. एकीकडे ‘अ‍ॅन्युटी’मध्ये शंभर-दोनशे कोटींचे कंत्राट दिले जात असले तरी दीड कोटींच्या या मर्यादेमुळे लहान कंत्राटदारांना रस्ता, रपटा, पुलाची भिंत या सारख्या दुरुस्तीची कामे मिळविणे सोपे झाले आहे. नोंदणीचा गुंता सुटलासार्वजनिक विकासाच्या बांधकामांमध्ये अधिकाधिक स्पर्धा व्हावी, शासनाचा महसूल वाचावा, दर्जा मिळावा या उद्देशाने कंत्राटदाराला नोंदणी (रजिस्ट्रेशन) बंधनातून मुक्तता देण्यात आली होती. त्याला प्रचंड विरोध झाल्याने व नोंदणीशिवाय काम शक्य नसल्याचे लक्षात आल्याने अखेर ही अट मागे घेण्यात आली. आता दीड कोटीपर्यंतच्या कामांसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. तर दीड कोटींवरील कामांसाठी शासनाच्या कोणत्याही एका विभागाचे रजिस्ट्रेशन असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ५० कोटींवर हवे बी-२ टेंडर : बांधकाम खात्यातील सूरशासनाने बी-२ टेंडरसाठी दीड कोटींवरील कामे निश्चित केली असली तरी प्रत्यक्षात ५० कोटींवर बी-२ टेंडरची अट असावी, असा कंत्राटदार व बांधकाम यंत्रणेतील सूर आहे. त्यापेक्षा कमी रकमेच्या कामात बी-२ टेंडर यशस्वी होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यात मानोरा ते माहूर या १८० कोटींच्या रस्त्याचे काम काढले गेले. मात्र या कामासाठी स्थानिक पातळीवर कुणी कंत्राटदार मिळतो का या दिशेने एजंसीने चाचपणी चालविल्याचे सांगितले जाते. यावरून बी-२ टेंडर प्रक्रिया सहसा कुणी स्वीकारण्यास तयार होत नसल्याचे दिसून येते.