शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘आयुर्वेद’चे कर्मचारी वेतनापासून वंचित

By admin | Updated: August 26, 2014 00:15 IST

येथील गजानन महाराज संस्थानद्वारा संचालित आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालयातील कर्मचारी गेल्या दोन वर्षांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

प्रकाश लामणे - पुसदयेथील गजानन महाराज संस्थानद्वारा संचालित आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालयातील कर्मचारी गेल्या दोन वर्षांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. भविष्य निर्वाह निधी व एलआयसीचे हप्ते थकले आहे. संबंधित कार्यालयाकडून व्यवस्थापनाला जाब विचारला जात असल्याने जुन्या व्यवस्थापनाने बँक खातेच सील बंद केले आहे. या प्रकाराने येथील कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात दिसत आहे. गजानन महाराज संस्थानद्वारा १९९२ पासून आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय चालविले जाते. या महाविद्यालयाचा कारभार गेल्या चार ते पाच वर्षांपासून पुरता ढेपाळला आहे. कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन होत नाही. भविष्य निर्वाह निधी व एलआयसीचे हप्ते भरले जात नाही. अगदी आर्थिक विवंचनेत फसलेल्या या महाविद्यालयात पुरेसा कर्मचारी वर्गसुद्धा नाही. त्यामुळे गजानन महाराज संस्थान या जुन्या व्यवस्थापनाने सदर महाविद्यालय तत्कालीन अध्यक्ष जयंत आडे व संचालक मंडळाने एका ठरावानुसार २००५ मध्ये जनता शिक्षण प्रसारक मंडळ या नव्या व्यवस्थापनाकडे चालविण्यास दिले. या संस्थेचे अध्यक्ष जय नाईक आहेत, हे विशेष. नवीन संचालक मंडळ येऊनही महाविद्यालयाच्या परिस्थितीत बदल झाला नाही. आगीतून निघून फुफाट्यात जाण्यासारखी त्यांची अवस्था झाली आहे. या महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे २७ महिन्याचे पगार थकीत आहे. सात वर्षांपासून भविष्य निर्वाह निधी, एलआयसी, बँक कर्ज हप्ते भरले गेले नाही. त्यामुळे आयुर्वेद महाविद्यालय कुणाचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आपल्या हक्काच्या पगाराबाबत कर्मचारी दोनही व्यवस्थापनांना विनवणी करतात. परंतु उडवाउडवीची उत्तरे दिली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी आंदोलन, संप, बहिष्कार आदी करीत आहे. मात्र कोणताही परिणाम दोनही व्यवस्थापनावर झाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यात असंतोष घुमसत आहे. आता अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक यांनी उपाययोजना करावी, अशी मागणी कर्मचारी करीत आहे. सध्या तरी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय कर्मचारी महासंघाचे डी.एम. वाणी, एस.जी. हिवरकर, एस.सी. देशमुख, एस.एस. पडघने, एम.एम. राठोड, साजिद अहमद, एम.डी. जाधव, बी.बी. चाकीलवार, जी.जी. मोरे, आय.पी. जाधव, व्ही.एम. टोपणे यांनी आंदोलन तीव्र केले आहे. कर्मचाऱ्यांचा पगार व इतर समस्यांबाबत काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रस्तूत प्रतिनिधीने जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जय नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हा व्यवस्थापनाचा प्रश्न आहे. सध्या मी स्वत: व माझी आई आजारी आहे. आपणाशी जास्त बोलू शकत नाही. मी आपल्याला नंतर फोन करतो, असे सांगितले. तर आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुंबळे म्हणाले, आयुर्वेद महाविद्यालयावर सध्या जय नाईक यांचे व्यवस्थापन आहे. जुने व्यवस्थापन गजानन महाराज संस्थान २४ आॅगस्ट रोजी कॉलेजमध्ये गेल्याचे समजले. मी सध्या बाहेरगावी असल्याने अधिक माहिती सांगण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.