शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवातून कोविड लसीकरणाची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:50 IST

मुकेश इंगोले दारव्हा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले. त्याउपरही सर्वत्र गणेशोत्सवाची ...

मुकेश इंगोले

दारव्हा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले. त्याउपरही सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. परंतु या धामधुमीतही येथील एका गणेश मंडळाने नियमांचे पालन करण्यासोबतच कोविड लसीकरणाची जनजागृती करून सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.

ओम गणेश मंडळाने स्थापना केलेले कोविड लसीवर विराजमान इवलेसे बाप्पा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर इतर अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. उत्सवाच्या माध्यमातून समाजसेवेची परंपरा या मंडळाने सुरू केली. सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

येथील अंबिकानगरातील हे मंडळ गणेशोत्सवात दरवर्षी काहीतरी वेगळे सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबविते. यावर्षी कोविड लसीवर विराजमान गणपती बाप्पा कोरोनाबाबत जनजागृती करतानाचे चित्र निर्माण करण्यात आले आहे. मूर्तिकार महेश दंडे यांनी केवळ नऊ इंच उंचीची सुबक गणेश मूर्ती साकारली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. या आजारावर अद्याप औषध निघाले नाही. त्यामुळे लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. लस घेण्यासाठी सर्वच स्तरावरून आवाहन केले जात आहे. तरीसुद्धा यासाठी आणखी जनजागृतीची गरज लक्षात घेता या मंडळाने तसा देखावा तयार केला. त्याचबरोबर सर्वात कमी उंचीची मूर्ती स्थापन व कोरोनाचे सर्व नियम पाळून उत्सव साजरा केला जात आहे.

नायब तहसीलदार सुनील सरागे यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर व नागरिकांसाठी लसीकरण शिबिर, दिव्यांग चित्रकार राजू राठोड याचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाच्या सदस्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला. ॲड. नितीन जवके, ॲड. सचिन गोरले, सुनील आरेकर यांच्या मार्गदर्शनात मंडळाचे अध्यक्ष जीवन काळे, उपाध्यक्ष संदीप शिले, सचिव स्वप्निल राठोड, कोषाध्यक्ष प्रवीण राऊत, विलास शिले, महेश दंडे, निखिल मडसे, किशोर राऊत, ऋषिकेश गोटे, गौरव डोमाळे, अमोल राठोड आदींनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.

बाॅक्स

विविध उपक्रम राबविले

ओम गणेश मंडळाने सामाजिक उपक्रम राबविणारे मंडळ म्हणून ओळख निर्माण केली. यापूर्वी गणेशोत्सव तसेच मिरवणुकीच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या, वृक्षरोपण, स्त्री भ्रूणहत्या, बेटी बचाओ, बेटी पढाओ, वृद्धाश्रम आदी समस्येवर प्रकाश टाकला. त्यामुळे मंडळाच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.