लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक तथा अॅथलेटिक कोच अजय प्रकाशराव मिरकुटे यांना महागुरू द्रोणाचार्य राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.मुंबई येथे ज्ञानराज व स्वरकुल संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या यशाबद्दल त्यांचे स्वागत होत आहे.
अजय मिरकुटे यांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 21:50 IST