शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

महागाव ठाण्यात रात्री फिर्याद घेण्यास टाळाटाळ

By admin | Updated: February 27, 2017 00:58 IST

येथील पोलीस ठाण्यात रात्रीला कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण सांगून फिर्याद नोंदवून घेतली जात नाही.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : बीट टार्गेटमुळे जमादार झाले हैराण संजय भगत  महागाव येथील पोलीस ठाण्यात रात्रीला कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण सांगून फिर्याद नोंदवून घेतली जात नाही. त्यामुळे या घटनेची तीव्रता आपसूकच कमी होत आहे. अनेकदा आॅनलाईन एफआयआर नोंदणी करताना सर्व्हर डाऊनचे कारण पुढे करून फिर्यादीला दोन-दोन तास ठाण्यात बसवून ठेवले जात असल्याचे येथे दिसून येते. हिवरा, सवना, फुलसावंगी, गुंज आणि महागाव टाऊन हे पाचही बिट कमाईचे म्हणून ओळखले जातात. कधी काळी हे बिट मिळावे म्हणून बोली लावण्यात येत असल्याची चर्चा कर्मचाऱ्यात रंगत असायची. आता वरली मटका, जुगार आणि हातभट्टीच्या दारूचे मोठ्या प्रमाणात गाळप केले जाते. मुडाणा, फुलसावंगी, सवना अन्य ठिकाणी दारूबंदी विभागाने हातभट्टीवर कारवाई केली. परंतु अद्यापही त्या विक्रेत्यांचा कायम बंदोबस्त झाला नाही. तालुक्यात दररोज ४० हजार लिटर दारूचे गाळप केले जाते. या गुत्त्यातून मिळणारे उत्पन्न मोठे असल्याची चर्चा होत असते. या कारणावरून कित्येक वेळा टार्गेट पूर्ण न करणाऱ्यांकडून बीट काढून घेतले जातात. सुरुवातीला अशा दारू विक्रेत्यांवर धाड मारून कारवाईचे नाटक पोलिसांनी केले. परंतु त्यांना आता खुलेआम मुभाच दिल्याचे दिसत आहे. पोखरी, फुलसावंगी येथे खुलेआम मटका-जुगाराचे अड्डे सुरू आहे. रात्रीची गस्त बंद असून कर्मचारी आपआपल्या गावी निघून जातात. बंदोबस्ताच्या फिक्स पॉर्इंटवर कुणीही आढळून येत नाही. एवढेच काय तर शासनाचे कोषागारही सुरक्षित नाही. ग्रामीण भागातील नागरिक तर सोडाच शहरातील नागरिक रोज रात्रीला चोराच्या भीतीने रात्र जागून काढतात. कनजखेड चे किसन पवार २० फेब्रुवारी मुलगा हरविल्याची फिर्याद देण्यासाठी गेला असता त्याला पैशाची मागणी करण्यात आल्याची माहिती आहे. परंतु अधिकाऱ्यांचा आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांवर वचक दिसत नाही.