शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

फिरत्या वन पथकाला खोटे ठरविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: December 19, 2015 02:25 IST

यवतमाळ व पांढरकवडा फिरत्या पथकाची जप्ती खोटी ठरविण्यासाठी सावळी सदोबा जंगलांमध्ये पुन्हा सागवान जप्त केले.

सावळीतील वृक्षतोड : पुन्हा जप्तीची ‘कामगिरी’ यवतमाळ : यवतमाळ व पांढरकवडा फिरत्या पथकाची जप्ती खोटी ठरविण्यासाठी सावळी सदोबा जंगलांमध्ये पुन्हा सागवान जप्त केले. सावळी जंगलात आॅक्टोबरमध्ये अवैध वृक्षतोड उघडकीस आली होती. यातील वरुड (तुका) बीटमध्ये कक्ष क्र. ४, ५ व ६ चे निरीक्षण यवतमाळ फिरते पथकाचे आरएफओ गौपाल यांनी केले. त्यात १७६ थुटं आढळून आली. पांढरकवडा फिरते पथकाचे आरएफओ वारे यांनी माळेगाव बीटमधील कक्ष क्र. ७ आणि ८ ची तपासणी केली. तेथे ११३ थूटं आढळून आले. यात वनरक्षक ते आरएफओवर कारवाई अपेक्षित होती. मात्र ती तर दूर उलट याच वन अधिकाऱ्याने फिरत्या पथकांच्या कारवाईत संभ्रम निर्माण करून ती खोटी ठरविण्याचा प्रयत्न केला. दक्षिण आर्णीचे वनपरिक्षेत्र अधिकारी हजारी जाधव यांनी वरुड बीटमधून १५ घनमीटर सागवान जप्त दाखवून वन गुन्हा नोंदविला. तशीच ‘कामगिरी’ माळेगाव बीटमध्य केली गेली. जप्तीच्या या ‘कामगिरी’ने फिरत्या पथकाची पहिली कारवाई सदोष दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. मुख्य वनसंरक्षकांनी या अवैध वृक्षतोडीची चौकशी फिरत्या पथकाकडून काढून घेऊन सहायक वनसंरक्षक लक्ष्मण गाडे यांच्याकडे दिली. वास्तविक गाडे यांच्याच कार्यक्षेत्रात ही वृक्षतोड झाली असताना ते किती प्रामाणिकपणे याची चौकशी करतील हा संशोधनाचा विषय आहे. यवतमाळ वनपरिक्षेत्रात ई-वर्ग जमिनीवरील अवैध वृक्षतोडीत वन मजुरांपासून निलंबन कारवाईचा प्रारंभ झाला आहे तर दुसरीकडे सावळीतील संरक्षित वनात भलीमोठी वृक्षतोड होऊनही अद्याप कारवाई झाली नाही. ही कारवाई ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)अंजनखेड वनपालाचा हॅमरडीएफओ प्रमोद लाकरा यांनी ११ आॅक्टोबर रोजी आर्णी वनपरिक्षेत्रातील सुभाषनगर लोकरवाडी येथे घातलेल्या धाडीत २६ नग सागवान सापडले होते. विशेष असे त्यावर अंजनखेड क्षेत्र सहायकाचा सरकारी पासिंग हॅमर आढळून आला होता. शासकीय मालावर मालकीचा हॅमर सापडल्याने गैरप्रकार सिद्ध झाला. या वन क्षेत्रपालाचा ‘मावसा’ हा हस्तक आहे. माळेगावातही ‘पॉवर’ फुल तस्कर आहे. तो माल कापतो आणि मावसा ट्रॅक्टरने वाहतूक करतो. मात्र त्यात अद्याप कारवाई नाही.