शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळातील वीज चोरीच्या भागात एरियल बंच केबल टाकण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 10:56 IST

वीज चोरी जादा असणाऱ्या भागात आता एरियल बंच केबल टाकण्याचा निर्णय महावितरणने घेतला. यामुळे वाढत्या वीज चोरी आणि हानीला लगाम घातला जाणार आहे.

ठळक मुद्देमहावितरण कर्मचाऱ्यांना कामाचे टार्गेटकर्मचाऱ्यांना होणारी मारहाण निंदनीय ग्राहकांकडून महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना होणारी मारहाण निंदनीय असून अशा घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन खंडाईत यांनी आपण कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. आरोपींना तत्काळ अटक व्हावी आणि त्या

रवींद्र चांदेकर।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीज चोरी जादा असणाऱ्या भागात आता एरियल बंच केबल टाकण्याचा निर्णय महावितरणने घेतला. यामुळे वाढत्या वीज चोरी आणि हानीला लगाम घातला जाणार आहे.संपूर्ण राज्यातच वीज चोरी आणि हानीचे प्रमाण वाढत आहे. काही जिल्ह्यांमये तर वीज चोरी व हानीचे प्रमाण २५ टक्केपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या चोरीला लागम घालण्याचे आव्हान महावितरणपुढे उभे टाकले आहे. त्यावर मात करण्यासाठी आता जादा वीज चोरी आणि हानी असलेल्या भागात एरियल बंच केबल टाकण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. यामुळे वीज चोरी आणि हानीला आळा बसू शकेल, अशी महावितरणला अपेक्षा आहे. अमरावती परिमंडळातील भाजीबाजार, कडबिबाजार आदी परिसरात वीज चोरी व हानीचे प्रमाण जादा असल्याने तेथे एरीयल बंच केबल टाकण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहे.नागपूर परीक्षेत्राचे प्रादेशिक संचालक खंडाईत यांनी बुधवारी अमरावतीत बैठक घेतली. त्यात वारंवार आढावा घेऊनही परिमंडळातील काही कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे वसुली आणि ग्राहकांच्या सेवेत पाहिजे तसा फरक पडत नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला. ग्राहक सेवा व महावितरणच्या एकूणच कामासाठी कॅज्युअल अ‍ॅटीट्युड असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. चांगले काम करणाऱ्यांचा गौरव, तर कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांच्या कामाची नोंद गोपनीय अहवालात घेतली जाणार असल्याची तंबी त्यांनी दिली. महावितरण ही प्रथम सेवा, नंतर मोबदला घेणारी कंपनी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१८ हजार मेगावॅटची दररोज खरेदीमहावितरण दररोज १८ हजार मेगावॅट वीज खासगी व शासकीय स्त्रोतांकडून खरेदी करून ती ग्राहकांना पुरविते. महावितरणच्या उत्पनाचा ८७ टक्के खर्च वीज खरेदीवर होतो. त्यामुळे ग्राहकांना वापरलेल्या विजेचे पैसे वेळेत भरण्याची शिस्त लावणे गरजेचे असल्याचे भालचंद्र खंडाईत यांनी सांगितले.अमरावती परिमंडळात वीज हानीत सतत होणारी वाढ, चिंतेची बाब असून ग्राहकांना अचूक बिल मिळावे, तसेच दर्जेदार सेवा मिळावी यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांना कामाचे टार्गेट दिले.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरण