शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेत मंडळाची नियुक्ती

By admin | Updated: May 30, 2014 00:26 IST

अमरावती विभागात शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाच येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आल्याने हे प्रशासकीय मंडळच आता वादाच्या

वणी : अमरावती विभागात शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाच येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आल्याने हे प्रशासकीय मंडळच आता वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे.अमरावती विभागात येत्या २0 जूनला शिक्षक मतदार संघाची निवडणूक होत आहे. त्यासाठी २0 मेपासून अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र जिल्हा उपनिबंधकांनी शासनाच्या २0 मे रोजीच्या पत्रान्वये २३ मे रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे. सदर प्रशासकीय मंडळातील सदस्यांची नावे आमदार वामनराव कासावार यांच्या शिफारशीने घेण्यात आली आहे. ही बाब आचारसंहितेचा भंग करणारी व बेकायदेशीर असल्याची तक्रार विठ्ठल झाडे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.नव्याने नियुक्त केलेल्या प्रशासकीय मंडळात दोन सदस्य शिक्षक असून ते शिक्षक मतदार संघाचे मतदार आहेत, हे विशेष. मंडळातील कोणत्याही व्यक्तीवर कुठलाही गुन्हा नोंद नसल्याची खात्री करून नियुक्ती करण्याचे आदेश शासनाने जिल्हा उपनिबंधकांना दिले होते. मात्र नियुक्त झालेल्या एका सदस्यावर वणी पोलीस ठाण्यात अपराध नंबर २२४/२0१३ नुसार भादंवि कलम २९४, ५0६, १४३, ३४ नुसार गुन्हा दाखल असल्याचेही झाडे यांचे म्हणणे आहे. तरीही त्यांची मंडळात नियुक्ती कशी झाली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.नव्याने नियुक्त प्रशासकीय मंडळातील काही सदस्य सहकारी संस्थेचे किंवा ग्रामपंचायतींचे सदस्यही नाही. तसेच राखीव गटातील सदस्य नियुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे नेमलेले प्रशासकीय मंडळ बेकायदेशीर असल्याचे झाडे यांनी आक्षेपात नमूद केले आहे. अडते व मापारी गटातूनही सदस्य नियुक्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी नेमलेले प्रशासकीय मंडळ बरखास्त करावे, अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा झाडे यांनी दिला आहे.प्रशासक मंडळ स्थापन होऊन आठवडा उलट नाही तोच आक्षेप दाखल झाल्याने हे प्रशासक मंडळच वादात सापडले आहे. झाडे यांच्या आक्षेपानंतर आता जिल्हा उपनिबंधक कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)