शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांना एकस्तर लागू करा

By admin | Updated: July 5, 2017 00:14 IST

सन २००६ नंतर सेवेत रुजू झालेल्या आदिवासी व नक्षलप्रभावीत क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगानुसार दोन महिन्यात एकस्तर वेतनश्रेणी लागू करावी, ....

उच्च न्यायालयाचे आदेश : थकबाकीसाठी तीन महिन्यांचा अवधीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सन २००६ नंतर सेवेत रुजू झालेल्या आदिवासी व नक्षलप्रभावीत क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगानुसार दोन महिन्यात एकस्तर वेतनश्रेणी लागू करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या.भूषण धर्माधिकारी व न्या.रोहीत देव यांनी मंगळवारी जारी केले आहे. या प्राथमिक शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणीची थकबाकी देण्यासाठी न्यायालयाने तीन महिन्यांचा अवधी दिला आहे.जिल्हा परिषदेतील २९२ प्राथमिक शिक्षकांच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे यांनी अ‍ॅड.सुभाष चाकोतकर (नागपूर) यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका (३६९६/२०१६) दाखल केली होती. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघातर्फे अध्यक्ष राजुदास जाधव यांनी घेतलेल्या निर्णयानुसार संघातर्फे आसाराम चव्हाण यांनी याचिका दाखल केली. त्यांच्यातर्फे अ‍ॅड. प्रदीप क्षीरसागर यांनी युक्तिवाद केला. ग्रामीण विकास व स्वच्छता मंत्रालयाचे सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव आणि जिल्हा परिषद यवतमाळच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रतिवादी बनविण्यात आले होते. जळगाव, पुणे व अन्य भागात प्राथमिक शिक्षकांना सहावा वेतन आयोग मिळत असताना आम्हालाच का नाही, असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला होता. नांदेड येथील अशाच प्रकरणात औरंगाबाद उच्च न्यायालयाने निर्णय देताना प्राथमिक शिक्षकांना दिलासा दिला होता. याच आधारावर याचिकाकर्त्या शिक्षकांची मागणी निकाली काढण्याची तयारी शासनाने न्यायालयात दर्शविली. परंतु यवतमाळ जिल्हा परिषदेने अ‍ॅड.डी.एम. काळे यांच्यामार्फत बाजू मांडताना आक्षेप नोंदविला. २००६ नंतर सेवेत दाखल झालेल्या प्राथमिक शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याबाबत निर्णय झालेला नसल्याने हा विषय प्रलंबित पडल्याचे सांगितले गेले. मात्र, न्यायालयाने त्यांचा हा आक्षेप फेटाळून लावत आदिवासी व नक्षलप्रभावीत क्षेत्रात कार्यरत क व ड श्रेणीतील प्राथमिक शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगानुसार दोन महिन्यात एकस्तर वेतनश्रेणी लागू करावी व तीन महिन्यात थकबाकी द्यावी, असे आदेश मंगळवारी जारी केले. न्यायालयाच्या निर्णयाने प्राथमिक शिक्षकांना दिलासा मिळाला. एकस्तर वेतनश्रेणी लागू करण्यासाठी ‘इब्टा’ संघटनेतर्फे दिवाकर राऊत यांच्या नेतृत्त्वात पाठपुरावा करण्यात आला होता.