शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर पोलिसांनी पकडला जनावरांचा ट्रक

By admin | Updated: June 11, 2017 00:24 IST

गोपनिय माहितीच्या आधारे शनिवारी पहाटे ४ वाजता शिरपूर पोलिसांनी आबई फाट्यावर जनावराने भरलेला ट्रक पकडला.

लोकमत न्यूज नेटवर्क वणी : गोपनिय माहितीच्या आधारे शनिवारी पहाटे ४ वाजता शिरपूर पोलिसांनी आबई फाट्यावर जनावराने भरलेला ट्रक पकडला. या कारवाईत १० लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नागपूर येथून जनावरांनी भरलेला ट्रक शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणार असल्याची गोपनिय माहिती शिरपूरचे ठाणेदार सागर इंगोले यांना शुक्रवारी रात्री मिळाली. त्यानुसार, सदर ट्रक पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. शुक्रवारी रात्री योगेश ढाले, उल्हास कुरकुटे, प्रमोद जुनूनकर, शालिक वाघाये या पोलीस कर्मचाऱ्यांनी चारगाव चौकी येथे तर संतोष उघडे मारोती पाटील या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आबई फाट्यावर पहारा लावला. शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास एक ट्रक (क्रमांक एम.पी.०९-एच.जी.३४१४) आबई फाट्यावर पोहचताच, त्या ट्रकला अडवून पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रकची झडती घेतली असता, ट्रकमध्ये २२ गाई, दोन बैल व आठ लहान गोरे आढळून आले. या जनावरांची किंमत ८० हजार रुपये आहे. पोलिसांनी लगेच ट्रकमधील मो.मलिक मो.हबीब खान, शशिद अली रशिद अली सय्यद, रईस चॉंद खॉं पठाण, चंदन उमरावसिंग पुष्पक सर्व रा.सारंगपूर (जि.राजगड मध्यप्रदेश) यांना अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूरचे पोलीस निरीक्षक सागर इंगोले, योगेश ढाले, उल्हास कुरकुटे, प्रमोद जुनूनकर, शालिक वाघाये, संतोष उघडे, संजय खांडेकर आदींनी केली.