शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

आमदाराचे घर यवतमाळात तिजोरीची चावी मात्र मुंबईत !

By admin | Updated: June 26, 2014 00:01 IST

लोकसभा निवडणुकीत ‘स्टार प्रचारक’ म्हणून मिरविणारे काँग्रेसचे विधान परिषद सदस्य हरिभाऊ राठोड यांचे घर यवतमाळात असले तरी त्यांनी आपल्या शासकीय निधीच्या तिजोरीची चाबी मुंबईच्या

यवतमाळ : लोकसभा निवडणुकीत ‘स्टार प्रचारक’ म्हणून मिरविणारे काँग्रेसचे विधान परिषद सदस्य हरिभाऊ राठोड यांचे घर यवतमाळात असले तरी त्यांनी आपल्या शासकीय निधीच्या तिजोरीची चाबी मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवली आहे. येथील सर्वच आमदारांनी आपला नोडल जिल्हा यवतमाळ घोषित केला आहे. खासदारांनीही यवतमाळलाच पसंती दिली. अर्थात या खासदार-आमदारांच्या शासकीय निधीचे अधिकार यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. या परंपरेला काँग्रेसचे विधान परिषद सदस्य हरिभाऊ राठोड यांनी मात्र फाटा दिला आहे. त्यांनी आपला नोडल जिल्हा मुंबई दाखविला. त्यांच्या शासकीय निधीचे अधिकार मुंबई शहरच्या जिल्हाधिकाऱ्यांना बहाल केले. घर यवतमाळात आणि तिजोरीची चाबी मुंबईत सोपविल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. तिजोरीची चाबी घरापासून दूर ठेवण्यामागे टक्केवारीच्या गणितात अडचण येऊ नये हा तर उद्देश नाही ना असा सूरही दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे. मुळात हरिभाऊ राठोड यांना विधान परिषदेवर घेण्यासाठीच काँग्रेसच्या गोटातून विरोध होता. परंतु प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुलाच्या संभाव्य लोकसभा उमेदवारीचा राजकीय स्वार्थ डोळ्यापुढे ठेऊन राठोड यांचे पुनर्वसन केले. त्यासाठी राठोड यांच्या मागे बंजारा आणि भटका विमुक्त समाज असल्याचा हवाला पक्ष श्रेष्ठींना दिला गेला. मात्र हरिभाऊंनी या समाजाला गृहित धरल्याचे लोकसभा निवडणुकीत सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या झालेल्या दारुण पराभवाने सिद्ध झाले. या पराभवाने हरिभाऊंच्या प्रचाराचा ‘स्टार’ही विझला. काँग्रेस पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून कोणतेही वजन नसलेल्या आणि राजकीय स्वार्थापोटी भाजपातून काँग्रेसमध्ये आलेल्या हरिभाऊ राठोड यांना आमदारकी दिल्याने काँग्रेसच्या गोटात माणिकरावांप्रती प्रचंड असंतोष धुमसत आहे. त्यातच आता हरिभाऊंनी आपल्या निधीचे अधिकार मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने हा असंतोष आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)