शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत सर्वांना ‘गणवेश’

By admin | Updated: July 11, 2016 02:17 IST

जिल्हा परिषदेत सोमवारपासून शाळा भरल्याचे चित्र दिसून येणार आहे. कर्मचाऱ्यांंना गणवेश सक्ती करण्यात आल्यामुळे ....

निर्णय : आजपासून ‘ड्रेस कोड’ लागू, नियम मोडणाऱ्यांवर कारवाईयवतमाळ : जिल्हा परिषदेत सोमवारपासून शाळा भरल्याचे चित्र दिसून येणार आहे. कर्मचाऱ्यांंना गणवेश सक्ती करण्यात आल्यामुळे सोमवारपासून सर्व कर्मचारी एकाच गणवेशात कार्यालयात पोहोचणार आहे. गणवेश परिधान करून न आलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना ‘ड्रेस कोड’ लागू केला आहे. त्याची अंमलबजावणी गेल्या सप्ताहापासूनच करावयाची होती. त्यानुसार काही कर्मचारी गेल्या सोमवारीच नवीन गणवेशात आपापल्या कार्यालयातन पोहोचले. मात्र बहुतांश कर्मचाऱ्यांनी ड्रेस कोडला बगल दिली. टेलरने गणवेश शिवूनच दिला नाही, असा सोयीस्कर बहाणा त्यांनी शोधला. तथापि आता असा कोणताही बहाणा चालणार नाही. त्यामुळे सोमवार ११ जुलैपासून सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना गणवेशातच आपापल्या कार्यालयात पोहोचावे लागणार आहे.कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू करण्यात आल्यामुळे आता जिल्हा परिषदेत शाळा भरल्याचे चित्र निर्माण होणार आहे. आत्तापर्यंत नागरिकांना केवळ शाळेत विद्यार्थी आणि काही खासगी कंपन्यांमध्येच गणेशातील कर्मचारी दिसून येत होते. हे चित्र उद्यापासून पालटणार आहे. जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी एकाच गणवेशात दिसणार आहे. त्यामुळे कर्मचारी ओळखणेही सोपी होणार आहे. विशेष म्हणजे गणवेशातील कर्मचाऱ्यांना चहा टपरीवर शोधणेही सोपे होणार आहे. अनेक कर्मचारी कार्यालयीत वेळातही चहा टपरीवर गप्पा हाकताना दिसतात की नाही, हे सुद्धा आता स्पष्ट होणार आहे.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांंनी धाडसी निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना गणवेश सक्ती केली. कर्मचाऱ्यांनी सुरूवातीपासून त्याला नाके मुरडली. गणवेशात असल्यानंतर चहा, पान टपरीवर निवांत बसून गप्पा हाकणे, या निर्णयामुळे कठीण जाईल, असा कदाचित त्यांचा कयास असावा. तथापि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपला निर्णय ठामपणे कायम ठेवला. त्यापुढे कर्मचाऱ्यांचे काहीच चालले नाही. परिणामी आता कर्मचाऱ्यांना गणवेशातच आपल्या कार्यालयात पोहोचावे लागणार आहे. यामुळे काही मातब्बर कर्मचाऱ्यांना झटका बसणार आहे. हे कर्मचारी आत्तापर्यंत स्वत:लाच संबंधित विभागाचे ‘बॉस’ समजत होते. त्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता एकाच गणवेशात आपल्या खुर्चीत स्थानापन्न व्हावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यातील अधिकाऱ्याची कुचंबणा होण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)कर्मचारी नेत्यांना बसणार चापजिल्हा परिषदेत अनेक कर्मचारी संघटना कार्यरत आहेत. त्यांचे पदाधिकारी विविध विभागात काम करतात. काही संघटनांचे पदाधिकारी नेहमी तोऱ्यातच असतात. ते अधिकाऱ्यांसारखे वागतात. काही पदाधिकाऱ्यांचा खास राजकीय नेत्यांप्रमाणे पेहराव असतो. आता मात्र त्यांनाही चाप बसणार आहे. त्यांनाही गणवेशातच कार्यालयात यावे लागणार आहे. परिणामी कर्मचारी नेते आणि त्यांच्या संघटनांमधील सदस्य असलेले कर्मचारी, एकाच गणवेशात आढळणार आहे. यामुळे संबंधित कर्मचारी नेते आणि त्यांच्या कार्यकर्ते असलेल्या सदस्यांमधील रूंदावलेली दरी कमी होण्याची शक्यता आहे. तथापि कर्मचारी नेत्यांना मात्र काही काळ ओशाळल्यागतच होणार आहे. त्यांची पदाधिकारीपणाची ‘खुमखुमी’ चांगलीच जिरण्याची शक्यता आहे. हे पदाधिकारी आणि त्यांचे सदस्य सारख्याच गणवेशात राहणार असल्याने त्यांच्या संघटनेची ‘एकात्मता’ वाढण्यास मदत मिळणार आहे.