शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

सर्वपक्षीय कार्यकर्ते म्हणतात, आयात उमेदवार नको

By admin | Updated: August 1, 2016 00:46 IST

नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून हद्दवाढीने अस्तित्वात आलेल्या

नगरपरिषद निवडणूक : स्थानिक नेत्यांचा लागणार कस, नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी अनेक इच्छुक सुरेंद्र राऊत यवतमाळ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून हद्दवाढीने अस्तित्वात आलेल्या प्रभागात उमेदवार देताना सर्वच राजकीय पक्षांचा कस लागत आहे. त्यातच आता बाहेरील आयतीत उमेदवार नको असे म्हणत सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी दबाव आणणे सुरू केले आहे. तर काहींनी आतापासूनच उमेदवार निश्चित समजून प्रभागात अप्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केल्याचे चित्र आहे. यवतमाळ नगरपरिषदेवर भाजपाची दीर्घकाळापासून सत्ता आहे. ही सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान भाजपा नेत्यांपुढे आहे. तर पालिकेत हद्दवाढीने समाविष्ठ झालेल्या ग्रामीण भागात काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. त्यामुळे नगरपरिषदेत सत्ता स्थापण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. या प्रमुख राजकीय पक्षांच्या लढतीत त्या त्या प्रभागातील उमेदवार कोण हेही महत्वाचे ठरणार आहे. शिवाय शिवसेनेकडून सध्यातरी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे. बसपासुध्दा संपूर्ण शहरात उमेदवार उभे करण्याची चाचपणी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी ऐन वेळेवर कोणता पवित्रा घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकाच प्रभागातून निवडून आलेल्या विद्यमान नगरसेवकांना महिला आणि जातीय आरक्षणामुळे पर्यायी जागा निवडावी लगाणार आहे. त्यासाठी कोण पुढाकार घेतो अथवा आपल्या सहकाऱ्याच्या विरोधात लढणार काय याचीही चाचपणी केली जात आहे. विद्यमान नगरसेवकांपैकी कोणाला नाकारायचे आणि कोणाला उमेदवारी द्यायची असा पेच निर्माण होणार आहे. हा संभाव्य धोका ओळखूनच सत्ताधारी भाजपातील अनेक इच्छुकांनी आपल्या पध्दतीने उमेदवारीसाठी फिल्डींग लावणे सुरू केले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे अनेकांना लॉटरी लागली. आता याचाच फायदा नगरपरिषदेत होईल या आशेने भाजपामध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. भाजपात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी थेट वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहे. तर एका बाहेरच्या उमेदवाराने आपले तिकीट पक्के आहे, केवळ आरक्षणाची प्रतीक्षा असल्याचे सांगून जाहीर प्रचाराला सुरूवात केली आहे. यामुळे भाजपातील निष्ठावंताच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे. तर काँग्रेसकडून अद्याप पर्यंत कोणालाच कौल देण्यात आलेला नाही. भाजपातील सक्रिय गट आपल्या बाजूने कसा वळविता येईल, याचेही प्रयत्न होत आहे. मात्र काँग्रेसच नगरपरिषद निवडणुकीची जबाबदारी कोणावर सोपविणार हे अद्याप स्पष्ट नसल्याने अनेक इच्छुक बुचकळ््यात आहेत.