शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

सर्व पात्र शेतकºयांना कर्जमाफी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:28 IST

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत ६० लाखांवर शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.

ठळक मुद्देकिशोर तिवारी : निमणी-दाभाडी पोड येथे ‘सरकार आपल्या दारी’ उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत ६० लाखांवर शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. अर्ज भरण्यासाठी सध्या १५ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. तांत्रिक अडचणी असल्यास मुदत वाढविली जाणार आहे, अशी माहिती वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली.झरी तालुक्यातील निमणी-दाभाडी कोलाम पोड येथे जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी बोलेनवार यांनी आयोजित केलेल्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. २००९ ते २०१६ पर्यंत पीककर्ज थकीत असलेले व बँकांनी पुर्नगठित केलेले २०१७ च्या हंगामात एकही हप्ता न भरलेले शेतकरी पात्र असल्याची माहिती यावेळी तिवारी यांनी दिली. घरात वडील व १८ वर्षावरील सर्व वेगवेगळी सातबारा असणारी मुले स्वतंत्रपणे कर्जमाफीस पात्र असून दिवंगत शेतकºयांचे वारस यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप अपार, झरीचे तहसीलदार गणेश राऊत, गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ गेडाम, वणी वनपरिक्षेत्र अधिकारी पटवारी, पाटणचे ठाणेदार वाघ, डॉ महेद्र लोढा, धर्मा आत्राम, सुरेश बोलेनवार, अंकित नैताम, विलास आत्राम, भीमराव नैताम आदी उपस्थित होते .यावेळी दाभाडी, वरपोड, खडकडोह, पवनार, घोन्सा, पेंढरी, सोनेगाव शिवपोड परिसरातील कोलाम पोडावरील आदिवासींनी जमिनीच्या मालकीचा प्रश्न, घरकूल योजनेच्या अडचणी, शेतकºयांच्या शेतमाल विक्रीसाठी येत असलेल्या अडचणी, नवीन पिककर्ज ,मुद्राकर्ज वाटप, ग्रामीण जनतेला काम व खावटी, अन्न, आरोग्य, गुरांना चारा व पाणी यासह वीज वितरण, शिक्षण, प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न उपस्थित केले. आदिवासी बहुल भागात सातबारावर वारसाची नावे चढविणे तसेच पिवळ्या शिधा वाटप नाहीत आदी प्रश्न रेंगाळत असल्याची तक्रार करण्यात आली. या सर्व समस्यांवर तत्काळ तोडगा काढा, असे आदेश शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यांनी यावेळी दिले.