शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

सात दिवसानंतरही आरोपी मोकाटच

By admin | Updated: September 28, 2015 02:47 IST

येथील गोधणी मार्गावरील जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील खुद्द क्रीडा अधिकाऱ्यांच्या कक्षातच मद्यपींनी मैफिल भरवून त्यानंतर धुमाकुळ घातला.

क्रीडा कार्यालयात तोडफोड : वरिष्ठांकडूनच मिळत आहे अभय यवतमाळ : येथील गोधणी मार्गावरील जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील खुद्द क्रीडा अधिकाऱ्यांच्या कक्षातच मद्यपींनी मैफिल भरवून त्यानंतर धुमाकुळ घातला. संगणकासह इतर साहित्याची तोडफोड केली व सीपीयु चोरून नेला. ही घटना सोमवारी उघडकीस आली. सात दिवस उलटूनही यातील आरोपींना मात्र अटक करण्यात आली नाही. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात मद्यप्राशन करून तोडफोड करणारे आरोपी शहरात राजरोसपणे फिरत आहेत. या घटनेनंतर डीएसओ कार्यालयाकडून वडगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी हॅन्डबॉल प्रशिक्षक गणेश शिरसाठ (४०) व संगणक चालक प्रफुल्ल किनकर (३७) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. उल्लेखनीय म्हणजे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या कक्षात मद्यपान करून साहित्याची तोडफोड केल्यानंतर मद्यापींनी स्वत: भ्रमणध्वनीवरून जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांना घटनेची माहिती दिल्याचे समजते. क्रीडा अनुदानाच्या कमिशनच्या रकमेवरुन सदर घटना घडली असण्याची शक्यता आहे. रविवारी दुपारी ३ ते ५ यावेळी तीन ते चार मद्यपींनी क्रीडा अधिकाऱ्यांच्या कक्षाचा ताबा घेतला आणि रविवारची पार्टी साजरी केली. नंतर नशेत क्रीडा अनुदानातून मिळणाऱ्या कमीशनवर एकमेकांच्या व वरिष्ठांच्या हिशांवर चर्चा सुरू झाली. यातून वाद निर्माण झाल्यावर एकाने रागारागात क्रीडा अनुदानाची गोपनीय माहिती साठवून ठेवलेला संगणक, प्रींटर व सीपीयूची तोडफोड करून इतरही साहित्याची नासधूस केली. या घटनेनंतर त्याच व्यक्तीने त्वेषाने जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांना या घटनेबद्दल भ्रमणध्वनीवरून माहिती देऊन आपण तोडफोड केल्याचेही सांगितले. तसेच यावर तुमचे काय म्हणणे आहे, असेही विचारल्याचे कळते. या सर्व गंभीर प्रकाराबाबत क्रीडा अधिकाऱ्यांनी कमालीची चुप्पी साधली आहे. शासनाच्या क्रीडा या महत्वाच्या कार्यालयात घडलेल्या या प्रकरणाकडे होत असलेले दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरत आहे. (क्रीडा प्रतिनिधी)