शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

विजेअभावी ग्रामीण जनजीवन प्रभावित

By admin | Updated: June 12, 2017 02:06 IST

पावसाळा तोंडावर आला आणि विजेचा खेळखंडोबा होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले. वीज वितरण शहरी भागाकडे दक्षतापूर्वक लक्ष ठेवते.

महावितरणविरूद्ध रोष : दिवसभरातून ४० ते ५० वेळा खंडित होतो वीज पुरवठालोकमत न्यूज नेटवर्कवणी : पावसाळा तोंडावर आला आणि विजेचा खेळखंडोबा होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले. वीज वितरण शहरी भागाकडे दक्षतापूर्वक लक्ष ठेवते. परंतु ग्रामीण भागात वीज असूनही नसल्यासारखीच आहे. विजेअभावी ग्रामीण जनतेचे जनजीवनच विस्कळीत झाले आहे. माणसे फक्त शहरातच राहतात काय? खेड्यांमध्ये जनावरेच असतात काय? असा संतप्त सवाल ग्रामीण जनता विचारत आहे.वीज ही आता सजीवांना अन्न पाण्याएवढीच गरजेची बाब ठरली आहे. अन्नावाचून दोन दिवस सजीव काढू शकतील. परंतु दोन दिवस वीज नसेल, तर जीवांचे इतके हाल होतात की, सजीवांना जगणे त्रासदायक ठरते. अलिकडच्या काळात वीज एवढी दुर्बल का झाली, हे जनतेलाही समजायला मार्ग नाही. थोडीसी वाऱ्याची झुळूक आली तरी वीज खंडित होते. मग ती पुन्हा केव्हा सुरू होणार, याचा नेमही नसतो. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही देशातील खेडे मुलभूत सुविधांनी सशक्त करण्याचे कार्य सरकारला अजूनही जमले नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. वीज निर्मीती करण्यासाठी लागणारी कच्ची सामग्री मुबलक प्रमाणात असूनही राज्यातील जनतेला विजेचे चटके सहन करावे लागत आहे, ही राज्याची शोकांतिका आहे. प्रत्येक सरकार आरूढ होताना तीन वर्षात राज्य विजेच्या बाबतीत स्वयंनिर्भर होणार, सर्वांना २४ तास वीज मिळणार, असे आश्वासन देत आहे. मात्र हे आश्वासन पाळण्याचे कोणत्याही शासनाला अजूनतरी जमले नाही. ग्रामीण जनता अजूनही विजेअभावी तडफडताना दिसून येते. तालुक्यात ग्रामीण भागात वीज पुरवठा करण्यासाठी कायर, शिंदोला, पुनवट, लालगुडा येथे उपकेंद्र दिले आहेत. शिरपूर येथे वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहे, तेथे सहाय्यक अभियंता दर्जाचा अधिकारी नेमला आहे. तरीही ग्रामीण भागातील वीज सुरळीत चालू ठेवण्यात कंपनी अपयशी ठरत आहे. वीज सुरू असली तरी ती दिवसभर अविरतपणे सुरू आहे, असा दिवस खेड्यातील जनतेला पाहायला मिळतच नाही. दिवसभरातून ४० ते ५० वेळा वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. बहुतेक वेळा तर एकदा गेलेली वीज दोन-दोन दिवस सुरू होत नाही. यामुळे ग्रामीण भागातील पिठगीरण्या बंद राहतात. लघु व्यावसायीकाचे व्यवसायाचे खोबरे होते. महत्त्वाचे म्हणजे बहुतांश खेड्यात पाणी पुरवठा हा विंधन विहिरीवरून आहे. वीज नसल्याने गावकऱ्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे पाण्यावाचून जनतेचे प्रचंड हाल होतात. एक-दोन दिवस आंघोळ करणेसुद्धा टाळावे लागते. जनावरांना पाणी कोठून पाजावे, हा प्रश्न पडतो. शहरातील वीज पुरवठा खंडित होताच कंपनीचे कर्मचारी धावपळ करून तो तत्काळ सुरू करण्याचे प्रयत्न करतात. तर मग ग्रामीण भागासाठी हीच तत्परता का दाखविली जात नाही, असा ग्रामवासीयांचा सवाल आहे. विद्युत सहाय्यकाच्या नेमणुकीकडे दुर्लक्षग्रामीण भागातील विजेची देखभाल करण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामपंचायतीच्या शिफारशीने एक विद्युत सहाय्यक नेमण्याचे शासनाने जाहीर केले. मात्र वीज वितरण कंपनीने अजूनही या नेमणुका केल्या नाही. बहुतांश गावांमध्ये वीज कर्मचारी नसल्याने एखादा खासगी युवक जीव धोक्यात घालून वीज सुरू करण्याचा प्रयत्न करतात. ग्रामीण भागातील अभियंता व कर्मचारी शहरात राहून कारभार सांभाळत असल्याने ते वेळेवर जनतेच्या कामी पडत नसल्याच्या तक्रारी गावातून होतात, याकडेही वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.