शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

५० गावांमध्ये ठणठणाट

By admin | Updated: May 27, 2017 00:18 IST

विदर्भ-मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी पैनगंगा नदी यावर्षी हिवाळ्यातच पूर्णत: कोरडी पडली आहे.

पिण्याचे पाणी नाही : पैनगंगा नदीवर बंधारे उभारण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : विदर्भ-मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी पैनगंगा नदी यावर्षी हिवाळ्यातच पूर्णत: कोरडी पडली आहे. तसेच पैनगंगा नदी व ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पाणीही मिळेनासे झाले आहे. त्यामुळे नदी काठावरील विदर्भातील ५० व मराठवाड्यातील ३५ गावांमध्ये सध्या पाण्याचा ठणठणाट आहे. यावर्षी हिवाळ्यातच पैनगंगा कोरडी पडली. त्यानंतर कसा तरी एप्रिल महिना निघाला. आता मे महिना तर नागरिकांना नकोसा झाला आहे. कारण पिण्याचेही पाणी गावांमध्ये उपलब्ध नाही. नागरिकांना पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पुराचा फटका व हिवाळा, उन्हाळ्यात पाणीटंचाई दरवर्षीच येथील नागरिकांच्या नशिबी आहे. गेल्या १५ वर्षापासून इसापूर धरणावर अवलंबून असलेल्या ऊर्ध्व पैनगंगा डाव्या कालव्याचे काम रखडले आहे. हे काम अपूर्ण असल्याने आणि कालव्यात मोठेमोठे झाडे झुडपे वाढल्याने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. तसेच पैनगंगा नदी आॅगस्ट महिन्यापासून कोरडी पडली असल्याने दोन्ही भागातील शेतकऱ्यांसह रहिवासी वस्तीसाठी असलेल्या नळयोजनासुद्धा पाण्याअभावी बंद पडल्या आहे. पैनगंगा नदीत आणि डाव्या कालव्यात आवश्यक त्या प्रमाणात पाणी सोडले गेले नाही. माणसांसह जनावरांनाही आता पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी रबीचा गहू, हरभरा, करडी व सूर्यफुलासारखे पीक पाण्याअभावी वाऱ्यावर सोडले आहे. याचाही फटका शेतकऱ्यांना बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बोरी, कोठा, चातारी, देवसरी, कोपरा, माणकेश्वर, वीरसनी, दिघी, घामापूर, सिंदगी, सावळेश्वर, भोजनगर, दिघडी, कारखेड, उंचवडद, साखरा, खरूस, चालगणी आदींसह विदर्भातील ५० गावांना व मराठवाड्यातील ३५ गावांमध्ये पाणीच नसल्यामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक वर्षांपासून इसापूर धरणाच्या ६५ किलोमीटर डाव्या कालव्याचे अर्ध्यावर काम पूर्ण करणे आवश्यक आहे. पैनगंगा नदीत बारमाही पाणी उपलब्ध राहण्यासाठी नदीपात्रात कोल्हापुरी बंधारे उभारावेत, कालव्यासाठी अधिग्रहीत केलेल्या चालू भावाप्रमाणे मोबदला द्यावा, ऊर्ध्व पैनगंगा कार्यालय विभाग क्र.५ हे उमरखेड येथे स्थलांतरीत करावे आणि विदर्भ-मराठवाड्याच्या पैनगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांचा सिंचनाचा अनुशेष भरून काढावा आदी मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांच्या आहेत. परंतु आजपर्यंत त्यांच्या न्याय मागण्यांबाबत विचारच करण्यात आला नाही. प्रशासकीय अधिकारी व संबंधित मंत्र्यांना याबाबत अनेकवेळा निवेदने देवूनही पैनगंगा नदी व ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नाही. त्यामुळे हिवाळ्यात रबी पिकांवरही पाणी सोडावे लागते. ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेता अर्धवट कॅनॉलची कामे पूर्णत्वास नेवून पैनगंगा नदीवर ठिकठिकाणी बंधारे उभारावे, अशी मागणी चक्रधर देवसरकर, अ‍ॅड.अनिल माने, कैलास वानखेडे, कैलास माने, तुकाराम माने, धनंजय माने, सुनील देवसरकर, राहुल माने, भगवान माने, बळवंत माने आदींसह ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे. नियोजन आवश्यक पैनगंगेच्या काठावरील ५० हून अधिक गावांमध्ये दरवर्षीच तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. परंतु तरीदेखील योग्य नियोजन करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांना शेती तर सोडाच पिण्याच्याही पाण्यासाठी भटकावे लागते.