शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

जनावर तस्करी रोखण्यास प्रशासन अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 05:00 IST

महाराष्ट्र राज्यात गोहत्या व गोवंश हत्याबंदी लागू झाल्यानंतरही हैद्राबादच्या कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणावर नियमीतपणे जनावरे नेल्या जात आहे. मागील महिन्यापासून या तस्करीत वाढ झाली आहे. गेल्या ११ ऑक्टोबर रोजी पिंपळखुटी चेकपोस्टवरील बॅरेकेटींग तोडून तेलंगणात पळून जाणाऱ्या गुरे भरून असलेल्या कंटेनरला पोलिसांनी अडवून ४० जनावरांची सुटका केली.

ठळक मुद्देपांढरकवडा तालुक्यातून राजरोसपणे तस्करी : वाहन पास करून देण्यासाठी दलाल झाले सक्रीय, चौकशी करण्याची होतेयं मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : येथून जाणाऱ्या नागपूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गाने जनावरांची तस्करी सुरूच असून मोठ्या प्रमाणावर होणारी ही तस्करी रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.महाराष्ट्र राज्यात गोहत्या व गोवंश हत्याबंदी लागू झाल्यानंतरही हैद्राबादच्या कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणावर नियमीतपणे जनावरे नेल्या जात आहे. मागील महिन्यापासून या तस्करीत वाढ झाली आहे. गेल्या ११ ऑक्टोबर रोजी पिंपळखुटी चेकपोस्टवरील बॅरेकेटींग तोडून तेलंगणात पळून जाणाऱ्या गुरे भरून असलेल्या कंटेनरला पोलिसांनी अडवून ४० जनावरांची सुटका केली. ही घटना घडत नाही, तोच पुन्हा १७ ऑक्टोबरला याच चेकपोस्टवर गुरे भरून जाणाऱ्या कंटेनरला पोलिसांनी पकडून ३५ बैलांची सुटका केली. एकूण ३८ बैल असलेल्या या कंटेनरमध्ये तीन बैलांचा गुदमरून मृत्यू झाला होता. पाच-सहा दिवसाआड या घटना घडत आहे. जनावरांची वाहने तेलंगणातही पास करून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. परंतु जनावरांची तस्करी सुरूच आहे. पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तेलंगणामध्ये जनावरांची वाहने पास करून देण्याकरिता कोण मदत करतात, याचा शोध घेणे आवश्यक आहे. जनावरांची वाहने पास करून देणाऱ्या दलालांना राजकीय पाठबळ असल्याचे बोलल्या जात आहे. पोलिसांनी सखोल चौकशी करून या दलालांना बेड्या ठोकणे आवश्यक आहे. मुख्य सुत्रधार अद्यापही मोकळेच असल्याचे बोलल्या जात आहे. मागील तीन महिन्यात हैद्राबाद येथील कत्तलखान्यात कत्तलीसाठी नेणारे जवळपास नऊ ट्रक पांढरकवडा पोलिसांनी पिपंळखुटी चेकपोस्टवर पकडले होते. ट्रकचालक व संबंधितांना अटक केल्या जाते. जनावरांची सुटका केली जाते. परंतु जनावरांची तस्करी बंद का होत नाही, हा एक संशोधनाचा विषय आहे.पांढरकवडा तालुक्यातील पशुधन आले संकटातजनावरांची तस्करीला आळा न बसता, जनावरांची तस्करी सतत सुरूच आहे. प्रशासन मात्र मुग गीळून गप्प बसले आहे. या प्रकाराकडे गंभीरतेने पाहत नसल्याचा आरोप विविध संघटनांनी केला आहे. गोवंश हत्याबंदी कायदा होऊनही ट्रकद्वारे कत्तलीसाठी नेली जात आहे.

टॅग्स :Smugglingतस्करी