शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थिनींचे उपोषण

By admin | Updated: July 29, 2016 02:20 IST

शहरातील शिवाजीनगर परिसरातील आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींनी विविध मागण्यांसाठी बुधवारी सायंकाळपासून उपोषण सुरू केले.

विविध मागण्या : वसतिगृहासमोरच दिला ठिय्या यवतमाळ : शहरातील शिवाजीनगर परिसरातील आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींनी विविध मागण्यांसाठी बुधवारी सायंकाळपासून उपोषण सुरू केले. वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावरच या विद्यार्थिनींनी ठिय्या दिला आहे. मुलींच्या आदिवासी शासकीय वसतिगृहातील निकृष्ट दर्जाचे जेवण आणि गृहपाल व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची मागणी करीत त्यांनी उपोषणाला सुरूवात केली. जेवण नेहमीच अत्यंत निकृष्ट दर्जाचे मिळत असल्याने भोजनात सुधारणा करावी, तसेच भोजन कंत्राटदार बदलविण्याची मागणी यांनी लावून धरली आहे. याशिवाय गृहपाल आणि कर्मचाऱ्यांची बदली करावी, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे, निवासी गृहपालाची नियुक्ती करावी, आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. वसतिगृहातील कर्मचारी शिवीगाळ करतात, असा त्यांचा आरोप आहे. समस्या घेऊन गृहपालांकडे गेल्यास वसतिगृहातील प्रवेश रद्द करण्याची धमकी दिली जाते, निकृष्ट जेवणामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतो, दहा बाय दहाच्या खोलीत १३ ते १४ मुलींना राहावे लागते, दवाखान्यात नेताना पैसे घेतले जातात, कर्मचारी सोबत येत नाही, वसतिगृह स्वच्छ राहात नाही, कर्मचारी स्वत:ची कामे मुलींना सांगतात, भत्ता व्यवस्थित दिला जात नाही, आदी आरोपही विद्यार्थिनींनी केले आहे. या उपोषणाची दखल घेत गुरूवारी पांढरकवडा येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयातील विस्तार अधिकारी के.बी.पंधरे आणि डी.जे.उरकुडे यवतमाळात दाखल झाले. त्यांनी विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेत तातडीने प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या समस्या निर्धारित वेळेत सोडविण्याची ग्वाही दिली. मात्र विद्यार्थिनींनी मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात, असा हेका धरला. त्यामुळे वृत्तलिहिस्तोवर उपोषण सुरू होते. दरम्यान, वसतिगृहाच्या गृहपाल सध्या प्रशिक्षणासाठी बाहेर गावी गेल्या आहेत. प्रभारी गृहपाल म्हणून टी.एम.अगलधरे काम पाहात आहे. त्यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थिनींना जेवण करून घेण्याची विनंती केली. तसेच प्रवेशव्दारासमोर उपोषण न करता वसतिगृहाच्या प्रांगणात बसण्याचीही विनंती केली. मात्र उपोषणकर्त्या विद्याीर्थिनींनी त्यांची विनंती फेटाळून लावत प्रवेशव्दारासमोरच उपोषण सुरू ठेवले आहे. या दरम्यान तीन ते चार मुलींची प्रकृती बिघडल्याने त्यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे मुलींनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)