शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

बनावट आधार कार्ड बनविणारी टोळी सक्रिय

By admin | Updated: December 19, 2015 02:29 IST

रेशन परवानाधारकांकडून कार्डधारकांना धान्यासाठी आधार कार्डची मागणी केली जात आहे. शिवाय शासकीय कार्यालयात आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.

पैसेही उकळल्याच्या तक्रारी : दुसऱ्याच दिवशी कार्ड देण्याची दिली जाते हमीमांगलादेवी : रेशन परवानाधारकांकडून कार्डधारकांना धान्यासाठी आधार कार्डची मागणी केली जात आहे. शिवाय शासकीय कार्यालयात आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. याचाच फायदा घेत अज्ञानी आणि गरिबांना बोगस आधार कार्ड बनवून देणारी टोळी सक्रिय झाली आहे. त्यांनी अनेकांना गंडा घातल्याचे पुढे येत आहे. या टोळीतील लोक गावातील अशिक्षित व गरजू लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात. त्यांना केवळ एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मतदान कार्ड मागितले जाते. कार्ड बनविण्यासाठी २०० रुपयांची मागणी केली जाते. ठरल्याप्रमाणे व्यवहार झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी आधार कार्ड त्यांना उपलब्ध करून देतात. ना हाताचे ठसे, ना डोळ्याचा फोटो किंवा लाईनमध्ये उभे राहण्याचा त्रास नाही. त्यामुळे लोकांनीसुद्धा या टोळीकडून आधार कार्ड प्राप्त करून घेतले. या आधार कार्डविषयीची सत्यता वेबसाईटवर पडताळून पाहिली असता ‘नॉट ए व्हॅलिड आधार’ असा संदेश येतो. त्यामुळे परिसरातील काही लोकांनी संबंधितांकडून काढलेले आधार बनावट असल्याचे सिद्ध होते. तालुक्यात केवळ नेर येथे एक आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरू आहे. यासंदर्भात या केंद्राचे श्रेणीक सिंघवी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आधार कार्ड नोंदणीसाठी प्रत्यक्ष उपस्थिती गरजेचे असल्याचे सांगितले. शिवाय एखाद्याला हाताचे बोट नसेल तर त्याचेही आधार कार्ड निघत नसल्याचे ते म्हणाले. यावरून परिसरात बनावट आधार कार्ड तयार करून देणारी टोळी सक्रिय असल्याचे दिसून येते. अशा प्रकारे आधार कार्ड बनवून देणाऱ्यांचा शोध घेवून कारवाई करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)