शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

अपघात एक ठार, पाच गंभीर

By admin | Updated: August 1, 2016 00:45 IST

भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटून झालेल्या अपघातात एक तरुण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले.

वणीचे तरुण : जोडमोहाजवळील वळणावर कार उलटली यवतमाळ : भरधाव कार रस्त्याच्या कडेला उलटून झालेल्या अपघातात एक तरुण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरील जोडमोहा गावाजवळ रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. यवतमाळवरून वणी येथील तरुण कारने गावी परत जात असताना हा अपघात घडला. नकूल अशोक धोबे (२८) रा. शिवणी धोबे ता. मारेगाव असे मृताचे नाव आहे. तर शे.शकील शे.सईद (३४) रा. राजूर कॉलरी ता. वणी, अनिल गुंजेकर (३०), श्रीकांत गोहोकार, चालक सुनील गुंजेकार (३२), प्रवीण पांढरे (३२) सर्व रा. चिखलगाव ता. वणी अशी जखमींची नावे आहे. वणी तालुक्यातील हे तरुण रविवारी सकाळी एम.एच.३४-एए- ५५१३ क्रमांकाच्या स्वीप्ट डिझायर कारने यवतमाळात आले होते. यवतमाळातील काम आटोपून गावी परत जात असताना जोडमोहा जवळील वळणावर चालक सुनील गुंजेकर याचे नियंत्रण गेले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. त्यामुळे कारमध्ये बसून असलेल्या सर्वांना जबर मार लागला. यात नकूल धोबेसह सहा जण या अपघातात गंभीर जखमी झाले. अपघात होताच जोडमोहा येथील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना बाहेर काढले. दरम्यान वाहतूक शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक उपाध्ये घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तत्काळ यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींपैकी नकूल धोबे याला मृत घोषित करण्यात आले. इतर जखमींवर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. या अपघाताची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक समाधान धंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजू आडे करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)