शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात जप्तीची नामुष्की टळली

By admin | Updated: August 12, 2014 23:59 IST

शासनाने संपादित जमिनीच्या वाढीव मोबदल्याच्या एक कोटी ११ लाख १६ हजार ७४० रूपयांच्या वसुलीसाठी न्यायालयाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीचे आदेश दिले.

न्यायालयाचा आदेश : १ कोटी ११ लाखांच्या वसुलीचे प्रकरणयवतमाळ : शासनाने संपादित जमिनीच्या वाढीव मोबदल्याच्या एक कोटी ११ लाख १६ हजार ७४० रूपयांच्या वसुलीसाठी न्यायालयाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीचे आदेश दिले. जप्तीसाठी पोहोचलेल्या बेलीफ आणि अर्जदाराला जिल्हाधिकाऱ्यांनी १५ दिवसांची मुदत मागितल्याने जप्तीची नामुष्की टळली. येथील दारव्हा मार्गावरील औद्योगिक वसाहतीसाठी रमेश जैन रा. यवतमाळ यांची २२ एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने त्यांनी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात २००० साली वाढीव मोबदल्यासाठी दावा दाखल केला होता. तब्बल १० वर्षांनी २०११ मध्ये वाढीव मोबदल्याच्या खटल्याचा निकाल लागला. त्यामध्ये रमेश जैन यांनी सुमारे एक कोटी रूपये वाढीव मोबदला देण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. मात्र या रकमेचा प्रशासनाने न्यायालयात भरणा केला नाही. शिवाय भरणा करण्यासाठी सतत टाळाटाळ केली. दरम्यानच्या काळात रमेश जैन यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी आशा रमेश जैन, त्यांची मुले अनुप आणि सचीन यांनी वाढीव मोबदल्यासाठी न्यायालयीन लढाई सुरूच ठेवली. अखेर अ‍ॅड. जे. एम. बारडकर यांच्यामार्फत त्यांनी येथील दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयात वाढीव मोबदल्याच्या वसुलीसाठी दरखास्त प्रकरण दाखल केले. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक कोटी ११ लाख १६ हजार ७४० रूपयांच्या वसुलीसाठी जप्तीचे आदेश दिले. बेलीफ बुटले, अ‍ॅड. बारडकर, अर्जदार अनुप आणि सचिन जैन हे आदेश घेऊन जप्तीसाठी सकाळी ११ च्या ठोक्याला जिल्हाधिकारी कार्यालयात जप्तीसाठी आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुलरंजन महिवाल यांनी दालनात पाचारण करून त्यांची समजूत घातली. अलीकडेच रूजू झालो असल्याचे सांगून मोबदल्याच्या रकमेचा भरणा करण्यासाठी १५ दिवसांची मूदत द्यावी, अशी विनंती केली. अर्जदार जैन बंधूनीही समजूतदारपणा दाखवित त्यांची विनंती मान्य केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावरील जप्तीची नामुष्की पुन्हा एकदा टळली. (स्थानिक प्रतिनिधी)