शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

अबब ! जिल्हा परिषदेच्या एकाच शाळेत १६ अपंग शिक्षक

By admin | Updated: May 15, 2017 00:54 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया रविवारी राबविण्यात आली

समायोजनात तक्रारी : यवतमाळ पंचायतची प्रक्रिया उद्या लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया रविवारी राबविण्यात आली. इतर पंचायत समित्यांमधील समायोजन पार पडले, तरी यवतमाळ पंचायत समितीमध्ये मात्र ‘बोगस अपंगत्वा’च्या तक्रारींनी घोळ घातला. एकाच शाळेत तब्बल १६ शिक्षक अपंग असल्याचा अजब प्रकार उघड झाल्याने येथील समायोजनाची प्रक्रिया मंगळवारी राबविण्यात येणार आहे. सकाळी १० वाजतापासून घाटंजी, बाभूळगाव, कळंब, आर्णी, नेर, झरी, पांढरकवडा आणि मारेगाव या पंचायत समितीमधील शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू झाली. तर दुपारी २ वाजतापासून पुसद, उमरखेड, महागाव, वणी, दारव्हा, दिग्रस, राळेगाव, यवतमाळ पंचायत समित्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला आणि शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांची उपस्थिती होती. यात प्रामुख्याने दुर्गम भागातील आणि द्विशिक्षकी शाळांना शिक्षक देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, प्रत्येक पंचायत समितीमध्ये १५ ते २० शिक्षक अतिरिक्त असताना रिक्त जागांची संख्या मात्र दुप्पट होती. बाभूळगाव पंचायत समितीत १२ शिक्षकांचे समायोजन झाले, मात्र रिक्त जागा २९ होत्या. त्यामुळे समायोजनानंतरही अनेक जागा रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले. समायोजनात अपंग, परितक्त्या, वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात आले. नेमका हाच धागा धरून यवतमाळ पंचायत समितीमधील काही शिक्षकांनी अपंगत्वाची प्रमाणपत्रे सादर केली. यातील अनेक प्रमाणपत्रे बोगस असल्याच्या तक्रारी खुद्द शिक्षकांनीच केल्या. लोहारा येथील शाळेत १९ शिक्षक पदे असताना तेथील तब्बल १६ जणांनी अपंगत्वाची प्रमाणपत्रे सादर केली. उर्वरित ३ ूमहिला आहेत. त्यामुळे यवतमाळ पंचायत समितीची समायोजन प्रक्रिया स्थगित करून ती मंगळवारी १६ मे रोजी सीईओंच्या उपस्थितीत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यादी बदलावी लागली समायोजनाची प्रक्रिया राबविण्यापूर्वी संबंधित पंचायत समितीमधील रिक्त पदांची यादी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे जिल्हास्तरावरून रवाना करण्यात आली. मात्र, बहुतांश पंचायत समित्यांनी ही यादी वेळेत जाहीर केलीच नाही. त्यामुळे अनेक शिक्षकांना थेट समायोजनाची प्रक्रिया सुरू झाल्यावरच रिक्त जागांचे पर्याय पाहता आले. संचमान्यतेनुसार काही शाळांमध्ये अधिक पटसंख्या असूनही कमी शिक्षकांची पदे मंजूर दाखविण्यात आली. यावर वारंवार शिक्षकांनी आक्षेप घेतल्यामुळे रिक्त पदांची यादी दिवसभरात ३ ते ४ वेळा प्रशासनाला बदलावी लागली.