शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराचे ८८ लाख थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:31 IST

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाºया मध्यान्ह भोजनासाठी लागणारे इंधन, भाजीपाला व सकस आहाराचे देयक तसेच स्वयंपाकी, मदतनीस यांचे मानधनाचे ८८ लाख रुपये थकले आहे.

ठळक मुद्देदारव्हा तालुका : सात महिन्यांपासून मुख्याध्यापक अडचणीत

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाºया मध्यान्ह भोजनासाठी लागणारे इंधन, भाजीपाला व सकस आहाराचे देयक तसेच स्वयंपाकी, मदतनीस यांचे मानधनाचे ८८ लाख रुपये थकले आहे. तालुक्यातील सर्व शाळांची एवढी मोठी बिलाची रक्कम थकल्याने ही योजना सुरू कशी ठेवावी, या विवंचनेत मुख्याध्यापक आहे.तांदूळ, डाळीसह इतर साहित्य शासन पुरविते. मात्र त्यासाठी लागणारे इंधन, भाजीपाला व पूरक आहाराची तजवीज मुख्याध्यापकांना करावी लागते. मात्र या खर्चाचे बिल गेल्या सात महिन्यांपासून मिळाले नाही. स्वयंपाकी व मदतनीस यांचे मानधनही देण्यात आले नाही. त्यामुळे या योजनेचा भार मुख्याध्यापकांवर पडल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत दररोज मध्यान्ह भोजनातून सकस आहार पुरविण्याची जबाबदारी शासनाची आहे. यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. सर्व शाळांना तांदूळ, डाळ, तेल, मीठ, तिखट, हळद इत्यादींचा प्रत्यक्ष पुरवठा केला जातो. यासाठी लागणारे इतर साहित्य, इंधन, भाजीपाला आणि पूरक आहाराची व्यवस्था मात्र शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव या नात्याने मुख्याध्यापकांना करावी लागते. या खर्चाकरिता येणारे बिल नंतर धनादेशाद्वारे दिले जाते. मात्र धक्कादायक बाब म्हणजे गेल्या मार्चपासून बिलच काढण्यात आले नाही. तालुक्यातील सर्व शाळांमधील १ ते ५ चे १३ हजार १८३ आणि ६ ते ८ चे ८ हजार ५८०, असे एकूण २१ हजार ७६३ विद्यार्थी या योजनेचा लाभ घेतात. यापोटी महिन्याला शासनाने पुरविलेल्या साहित्याव्यतिरिक्त ९ लाख ८६ हजार २८६ रुपये खर्च येतो. असे सात महिन्याचे ६९ लाख ४ हजार २ रुपये होतात. त्याचबरोबर स्वयंपाकी व मदतनीस मिळून ३२२ जण आहे. त्यांच्या सहा महिन्यांच्या मानधनाचे १९ लाख ३२ हजार रुपये, असे एकूण ८८ लाख ३६ हजार २ रुपये थकले. हे सर्व पैसे थकल्यामुळे सर्व मुख्याध्यापकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.सप्टेंबरपासून केवळ तांदळाचा पुरवठासप्टेंबर महिन्यापासून या योजनेत थोडा बदल करून शाळांना केवळ तांदूळ पुरविला जाईल, अशी योजना असल्याची माहिती आहे. त्यामुळे इंधन, भाजीपाला व सकस आहारासोबत डाळ, तेल, मीठ, तिखट व हळद या वस्तूंचा भारदेखील आता मुख्याध्यापकांवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.