शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

८१९ पुलांची बांधकाम अभियंत्यांकडून तपासणी

By admin | Updated: August 24, 2016 00:48 IST

महाड दुर्घटनेनंतर सावध झालेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याने जिल्ह्यातील लहान-मोठ्या ८१९ पुलांची तपासणी केली

दुरुस्तीचे पाच वर्षांचे नियोजन : पहिल्या टप्प्यात रुंझा, बोरीअरब यवतमाळ : महाड दुर्घटनेनंतर सावध झालेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याने जिल्ह्यातील लहान-मोठ्या ८१९ पुलांची तपासणी केली असून त्यांच्या दुरुस्तीचे पाच वर्षांचे नियोजन केले आहे. २ आॅगस्टच्या मध्यरात्री मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील महाड शहराजवळ सावित्री नदीवरील पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता. त्यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या तमाम पुलांची तपासणी आणि आवश्यक असेल तेथे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासंबंधीची मार्गदर्शकतत्वे १९ आॅगस्ट रोजी जारी करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात अंमलबजावणी केली जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता एस.व्ही. सोनटक्के यांनी महाड दुर्घटनेनंतर लगेच सर्वच प्रकारच्या पूल तपासणीचे काम हाती घेतले. त्यात अडीचशे मीटरपेक्षा अधिक लांबी असलेले तीन, मोठे ६८ आणि छोटे ७४८ अशा एकूण ८१९ पुलांची बांधकाम अभियंत्यांमार्फत तपासणी केली गेली. या पुलांच्या दुरुस्तीचे पुढील पाच वर्षाचे नियोजन केले गेले. यातील आठ ते दहा पुलांची देखभाल दुरुस्ती पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे. त्यामध्ये पांढरकवडा मार्गावरील रुंझा येथील ६० वर्ष जुना पूल प्राधान्याने हाती घेतला जाणार आहे. दगडाने बांधलेल्या या पुलाला पर्यायी पूल उपलब्ध करून दिला जाणार आहे. यवतमाळ-दारव्हा मार्गावरील बोरीअरब येथे अडाण नदीवर ब्रिटीशकालीन पूल आहे. या पुलाची दुरुस्तीसुद्धा पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे. याशिवाय आणखी सहा ते आठ पूल तातडीच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निशाण्यावर आहेत. त्यात पुसद तालुक्यातील दगडाने बांधलेल्या चार पुलांचा समावेश आहे. अन्य पुलांची सुस्थिती असल्याचे सांगितले जाते. तरीही आवश्यकतेनुसार त्यांची देखभाल केली जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी) कुण्या अभियंत्याने किती मीटर लांबीच्या पुलाची तपासणी करावी याची जबाबदारीही निश्चीत करण्यात आली. त्यानुसार मुख्य अभियंत्यांकडे २०० मीटर व त्या पेक्षा अधिक लांबीचे सर्व पूल, अधीक्षक अभियंता यांच्याकडे ६० ते २०० मीटर, कार्यकारी अभियंता ३० ते ६० मीटर तर उपअभियंत्याकडे ३० मीटरपेक्षा कमी लांबीच्या सर्व पूल तपासणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंत्याकडे केवळ मोऱ्यांची तपासणी दिली गेली.