शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत ६७ शिक्षकांच्या बदल्या

By admin | Updated: May 18, 2016 02:43 IST

जिल्हा परिषदेत सध्या बदल्यांचा हंगाम सुरू असून मंगळवारी शिक्षकांची बदली प्रक्रिया पार पडली.

मात्र दिवसभर संभ्रम : शिक्षकांची प्रचंड गर्दी यवतमाळ : जिल्हा परिषदेत सध्या बदल्यांचा हंगाम सुरू असून मंगळवारी शिक्षकांची बदली प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत ६७ बदल्या करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. जिल्हा परिषदेत पदवीधर, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात पदवीधर शिक्षकांच्या १९ विनंती, २४ प्रशासकीय आणि १४ मुख्याध्यापकांच्या तसेच विस्तार अधिकाऱ्यांच्या तीन विनंती बदल्या करण्यात आल्या. बदली प्रक्रिया सुरू असल्याने जिल्हा परिषदेत शिक्षकांची प्रचंड गर्दी दिसून आली. पेसा आणि नक्षलग्रस्त क्षेत्रातील २३०० शिक्षकांची बदली प्रक्रिया बुधवारी पार पाडली जाणार आहे. या संबंधीच्या सूचना संबंधितांंना देण्यात आल्या आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत आज चांगलाच संभ्रम निर्माण झाला. बदल्यांची पूर्व तयारी नसल्याने अनागोंदी दिसत होती. शिक्षकांच्या बदल्या होणार की नाही यावर दिवसभर खल सुरू होता. नव्याने रुजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विभाग प्रमुखांकडून सोईचा सल्ला दिला जात असल्याचा आरोपही होत आहे. दुपारपर्यंत शिक्षकांच्या बदल्यांवर अधिकृतपणे बोलायलाही कुणी तयार नव्हते. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड यांच्याकडे बदलीबाबत विचारणा केली असता दुपारपर्यंत ते निश्चित काहीच सांगू शकत नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदलीवर नेमके काय सुरू आहे हे कळायलाही मार्ग नव्हता. यामुळे सर्व बदली इच्छुक शिक्षक गोंधळलेल्या अवस्थेत दिसत होते. जिल्हा परिषद सभागृहासमोर पदवीधर शिक्षकांची गर्दी दिसत होती. सकाळपासून आलेल्या शिक्षकांना या ठिकाणी पिण्याचे पाणीही उपलब्ध नव्हते. त्याचा फटका अनेकांना बसला. नाव पुकारल्यानंतर येण्यास वेळ झाला तर सरळ बदलीचा आदेशच मिळण्याचा धसका अनेक शिक्षकांनी घेतल्याने कुणी येथून हलायलाही तयार नव्हते.