शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

६६ लाखांची ताडपत्री खरेदी गाजली

By admin | Updated: July 13, 2016 03:12 IST

जिल्हा परिषद कृषी विभागाने खरेदी केलेल्या ताडपत्रीच्या मुद्यावर मंगळवारी स्थायी समितीची सभा चांगलीच गाजली.

जिल्हा परिषद : कृषी विभागाच्या कारभाराचे स्थायी समितीच्या सभेत चौकशीचे आदेश यवतमाळ : जिल्हा परिषद कृषी विभागाने खरेदी केलेल्या ताडपत्रीच्या मुद्यावर मंगळवारी स्थायी समितीची सभा चांगलीच गाजली. ६६ लाखांची ताडपत्री खरेदी करताना १३ लाख ९२ हजार रुपयांची अनियमितता झाल्याचा ठपका सदस्यांनी ठेवला आहे. यावरून कृषी विभागाच्या संपूर्ण कामकाजाचीच चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. कृषी विकास अधिकारी जगन राठोड वैद्यकीय रजेवर गेले आहेत. त्यांचा प्रभार घाटंजी येथील तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांच्याकडे आहे. स्थायी समितीच्या बैठकीत कृषी विभागातील एसडीपी पाईप खरेदीचा मुद्दा चर्चेला आला. ही खरेदी करण्यासाठी लागणारी समितीच एडीओंनी यांनी गठीत केली नाही. शिवाय एमईआयडीसी यांना पुरवठा आदेश देताना न्युबंस आणि मॅकनव या राज्याबाहेरच्या कंपन्यांची निवड केली. याची चौकशी करण्याचा ठराव समितीने घेतला. त्यानंतर प्रवीण देशमुख यांनी ताडपत्री खरेदीचा मुद्दा पुढे केला. १३ लाख ९२ हजार रुपये अतिरिक्त खर्च केल असून ही रक्कम कोणाकडून वसूल करायची असा प्रश्न प्रवीण देशमुख यांनी केला. कृषी विभागातील विस्तार अधिकारी रवींद्र देशमुख यांनी अद्यापही प्रभार दिला नाही. २४ तासाच्या आत प्रभार दिला नाही तर त्यांच्यावर फौजदारी करण्याचा ठराव समिती घेतला. कृषी विभागातील साहित्य खरेदीच्या अनागोंदीची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांच्या अध्यक्षतेत, उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुळकर्णी यांची समिती गठीत करण्यात आली. (कार्यालय प्रतिनिधी) शौचालय अनुदानाची चौकशी होणार घाटंजी तालुक्यातील मुरली येथे शासकीय सेवेत असलेल्या ११ जणांनी शौचालयाचे अुनदान लाटल्याचे गंभीर प्रकरण देवानंद पवार यांनी बैठकीत मांडले. याची तत्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश अध्यक्ष डॉ. फुपाटे यांनी दिले. त्यासाठी उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडून कोणतीच माहिती वेळेत दिली जात नाही, अशी तक्रार सदस्यांनी केली, यावर अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.