शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नेर तालुक्यात आढळले डेंग्यूचे ६० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:48 IST

नेर : तालुक्यात डेंग्यू व मलेरियाने डोके वर काढले आहे. परिसरातील नाले, रिकाम्या जागेत वाढलेले गाजरगवत डोकेदुखी ठरत असून ...

नेर : तालुक्यात डेंग्यू व मलेरियाने डोके वर काढले आहे. परिसरातील नाले, रिकाम्या जागेत वाढलेले गाजरगवत डोकेदुखी ठरत असून आजारांना निमंत्रण देत आहे.

आरोग्य विभाग नाल्यावर लक्ष केंद्रित करून मॅलेथीयन लिक्विडची फवारणी करत आहे. तालुक्यात आतापर्यंत १० डेंग्यू रुग्णांची नोंद झाली. तर ग्रामीण भागात ५ रुग्णांची नोंद आहे. तसेच खासगी रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात रुग्ण येत आहे. यात डेंग्यूचे ६०, तर मलेरियाचे ५० रुग्ण असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. नगरपरिषदेने नाल्या साफसफाई व कचरा गाड्या नियमित फिरवण्यावर भर दिला असला तरी नबाबपूर परिसर, साईधामनगर परिसर, नबाबपूर ते नेर परिसरातील मिलमिली नदीकडे दुर्लक्ष केले आहे. या नाल्यात मोठ्या प्रमाणात गटार जमा झाले आहे. बेशरम व गाजरगवत वाढले आहे. पाणी तुंबल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. भाजीबाजार परिसरात साचलेल्या सांडपाण्यात सडलेला भाजीपाला फेकला जातो. मिलमिली नदीतील घानकचराही रोगराई वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

कोट

नेर नगरपरिषद क्षेत्रात नाल्या साफ ठेवण्यासाठी विशेष लक्ष देऊन फवारणी केली जात आहे. आरोग्य विभाग यात हयगय करणार नाही, यावरही लक्ष दिल्या जात आहे.

- पवन जयस्वाल, उपसभापती तथा आरोग्य सभापती, नगरपरिषद, नेर

कोट

नेर नबाबपूर शहरात मलेरिया, डेंग्यूचा कहर वाढू नये यासाठी जनजागृतीसोबत मॅलेथीयन लिक्विडची फवारणी नाल्यावर केली जात आहे. नाल्यावर डासांचा उद्रेक वाढू नये यासाठी धूर फवारणी नियमित केली जाते.

- मनोज कुडमेथे, आरोग्य विभागप्रमुख, नेर