शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

५० गावांचा पाणीप्रश्न सुटणार

By admin | Updated: April 20, 2017 00:28 IST

जिल्ह्यातील ३४२ प्रकल्पांनी तळ गाठला. यामुळे प्रकल्पालगतच्या गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली.

तीन प्रकल्पातून पाणी सोडले : नागरिकांच्या आंदोलनानंतर घेतली दखल यवतमाळ : जिल्ह्यातील ३४२ प्रकल्पांनी तळ गाठला. यामुळे प्रकल्पालगतच्या गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली. यामुळे जिल्ह्यातील तीन प्रकल्पांमधील पाणी नदी पात्रात सोडण्यात आले. यातून ५० गावांतील पाणी टंचाईची समस्या सुटण्यास मदत मिळणार आहे. पाणीटंचाई निवारणासाठी अनेक प्रकल्पांतील पाणी आरक्षित करण्यात आले आहे. काही गावांमध्ये भीषण स्थिती निर्माण झाल्याने नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी तेथील गामस्थांनी केली होती. त्याबाबत पाटबंधारे विभागाकडे हा प्रस्ताव विचाराधीन होता. अखेर पाटबंधारे विभागाने सोमवारी सायंकाळी तीन प्रकल्पातील पाणी सोडण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. यामुळे या प्रकल्पातील पाणी नदी पात्रात सोडण्यात आले. मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवरील इसापूर धरण क्षेत्रात येणाऱ्या ४५ गावांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. प्रथम पाणी सोडल्यानंतरही काही गावापर्यंत पाणी पोहोचले नव्हते. त्यामुळे नागरिक उपोषणाला बसले होते. त्याची दखल घेत सोमवारी तीन दशलक्ष घनमीटर पाणी पुन्हा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. हे पाणी नदी पात्रात सोडण्यात आले. यामुळे उमरखेड तालुक्यातील उंचवडद व तिवडीपर्यंत पाणी पोहोचणार असल्याने ४५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. याशिवाय वाघाडी प्रकल्पातून एक दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आल्याने येळाबारा, सायखेडा आणि बेलखेडा येथील नागरिकांना पाणी मिळणार आहे. अंतरगाव प्रकल्पातून ०.११ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आल्याने पालोती, पन्हाळगाव व अंतरगाव येथील पाणीटंचाई निवारणास मत मिळणार आहे. (शहर वार्ताहर)