शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेचे ५० हजार शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: May 19, 2016 02:04 IST

खरिपाचा हंगाम तोंडावर आला असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद असलेले तब्बल ५० हजार शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत.

शिखर बँकेने अर्थचक्र थांबविले : एक लाख शेतकऱ्यांच्या शासनाकडे नजरा यवतमाळ : खरिपाचा हंगाम तोंडावर आला असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद असलेले तब्बल ५० हजार शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. राज्य सहकारी बँकेच्या कर्ज मंजुरीवर या शेतकऱ्यांच्या कर्जाचे भवितव्य अवलंबून आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने आतापर्यंत ४५६ कोटींच्या उद्दिष्टापैकी १२५ कोटींच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. परंतु आता जिल्हा बँकेकडील कर्जासाठीचा निधी संपला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्य सहकारी बँकेकडे ३०० कोटींच्या कर्जाची मागणी केली आहे. मात्र हे कर्ज अद्याप मंजूर झालेले नाही. दरवर्षी एप्रिल अखेर शिखर बँक कर्ज मंजूर करीत असताना यावर्षीच विलंब का असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हा बँकेने घेतलेले कर्ज मार्चपूर्वी न भरल्याचा हा फटका मानला जात आहे. शिखर बँकेच्या कर्जमंजुरीअभावी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पीक कर्जाचे जणू अर्थचक्र थांबले आहे. राज्य सहकारी बँक २३० कोटींचे कर्ज मंजूर करण्याची आशा जिल्हा बँकेला आहे. मात्र त्यासाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार याकडे जिल्हा बँक व शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. किमान मे महिना संपण्यापूर्वी शिखर बँकेच्या कर्जाचा निर्णय व्हावा, अशी जिल्हा बँकेची अपेक्षा आहे. शिखर बँकेने हातवर केल्यास ५० हजार शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुळात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दीड लाख सभासद आहेत. मात्र त्यापैकी एक लाख सभासद थकबाकीदार आहेत. त्यांच्या कर्जाचे पुनर्गठण केले जाणार आहे. अर्थात त्यांनी गतवर्षी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांना पाच हप्ते पाडून दिले जाणार आहे. परंतु या एक लाख शेतकऱ्यांना नवे कर्ज द्यायचे की नाही, याचा निर्णय राज्य शासन घेणार आहे. या एक लाख शेतकऱ्यांचा चेंडू आता शासनाच्या कोर्टात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)