शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा बिलात ५० टक्के सवलत

By admin | Updated: December 11, 2015 03:00 IST

जिल्हा परिषदेतील जलव्यवस्थापन समिती व स्वच्छता समितीच्या सभेत पाणीटंचाई आराखड्यावर चर्चा करण्यात आली.

जलव्यवस्थापन समिती सभा : पाणीटंचाई आराखडा सादर करण्याचे निर्देशयवतमाळ : जिल्हा परिषदेतील जलव्यवस्थापन समिती व स्वच्छता समितीच्या सभेत पाणीटंचाई आराखड्यावर चर्चा करण्यात आली. अनेक ठिकाणी नळ योजनांचे वीज बिल थकीत राहते. यामुळेच पाणीटंचाई निर्माण होते. यावर उपाय म्हणून ३१ मार्चपूर्वी थकीत वीज बिलापैकी ५० टक्केच रकमेचा भरणा करण्याची सवलत देण्यात आली आहे. ही बाब वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांनी या बैठकीत सांगितले.पाणीटंचाईसोबत स्वच्छतेचा आढावा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी घेतला. सर्व गटविकास अधिकाऱ्यांना त्वरित टंचाई आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले. हातपंप दुरुस्तीसाठी प्रत्येक पंचायत समितीत टंचाई सेल उघडून त्याचा नियमित अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले. जास्तीत जास्त गावे टँकरमुक्त करून तेथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास सांगितले. पुसद तालुक्यातील हर्षी व माळपठार या पाणीपुरवठा योजनेला पूर्ण दाबाने वीज मिळत नाही, म्हणून टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता व पुसद विभागातील कार्यकारी अभियंत्याला बैठकीस बोलविण्यात आले होते. तांत्रिक अडचण असल्याने हा वीज पुरवठा पूर्ण दाबाने होत नसल्याचे अभियंत्यांनी सांगितले. यावरच लवकरच तोडगा काढणार असल्याची ग्वाही दिली. स्वच्छतेच्या दृष्टीकोणातून बाभूळगाव तालुक्याची १०० टक्के हागणदारीमुक्त करण्यासाठी निवड करण्यात आली. हे उद्दीष्ट यावर्षीचे पूर्ण करण्यात यावे, असे अध्यक्षांनी सांगितले. यासाठी गुडमॉर्निंग पथक तयार करून गटविकास अधिकाऱ्यांनी अकस्मात भेट देऊन पडताळणी करावी, असेही निर्देश देण्यात आले. या बैठकीला उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुळकर्णी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, १६ ही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)