शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

हजाराच्या अनुदानासाठी ४०० रुपये खर्च

By admin | Updated: January 21, 2017 01:25 IST

सोयाबीन उत्पादकांना २०० रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासानाने जाहीर केला.

अनुदान नको, खर्च आवरा! : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी यवतमाळ : सोयाबीन उत्पादकांना २०० रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासानाने जाहीर केला. मात्र शेतकऱ्यांच्या हाती पडणाऱ्या अनुदानाचे निम्मे पैसे कागदपत्रे गोळा करण्यावर खर्च होत आहे. एक हजार रूपयांचे अनुदान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना ४०० रूपये खर्च करावे लागत आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांना २०० रूपये प्रती क्विंटल अनुदान मिळणार आहे. २५ क्विंटलपर्यंत हे अनुदान दिले जाणार आहे. प्रत्यक्षात या तीन महिन्यात भाव पडलेले होते. यामुळे चार ते पाच क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांनी विक्रीस नेले होते. आता अनुदान मिळविण्यासाठी प्रत्येक अर्ज चार प्रतीत सादर करण्याचे आदेश आहेत. त्यात सातबारा, पेरेपत्रक, आधारकार्ड, बँक पासबुक यांचा समावेश आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांचा जाण्या-येण्याचा खर्च वेगळाच. एका सातबाऱ्याकरिता ३० रूपये लागतात. तर एका पेरेपत्रकाकरिता तलाठी सरासरी ५० रूपये घेत आहे. यानंतर बाजार समितीमध्ये प्रस्ताव सादर करता येतो. चार पेरेपत्रकासाठी २०० रूपये आणि चार सातबाऱ्यासाठी १२० रूपये असे ३२० रूपये दोन कागदपत्रासाठी लागतात. प्रवासाची तिकीट व झेरॉक्स खर्च असा ४०० रूपयांचा खर्च एका शेतकऱ्याला सोसावा लागत आहे. (शहर वार्ताहर) इतर शेतकऱ्यांचे काय? सोयाबीनची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी पटवाऱ्यांकडे आहे. असे असताना पेरेपत्रकाची गरज का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाव कमी असल्याने तीन महिन्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले नाही. असे शेतकरी अनुदानास मुकणार आहे. तसेच खासगीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले त्यांना अनुदान मिळणार नाही. त्यामुळे अनेक शेतकरी अनुदानातून वगळले गेले आहे. यामुळे अनुदान म्हणजे धुळफेक करणारे ठरली आहे.