शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळखुटी आरटीओ चेकपोस्टवर दरमहा ३९ लाखांची ‘उलाढाल’

By admin | Updated: November 26, 2015 02:36 IST

दरमहा ३९ लाख रूपयांची उलाढाल असलेल्या पिंपळखुटीच्या सीमा वाहन तपासणी नाक्यावर ड्युटी मिळविण्यासाठी वाहतूक निरीक्षकांकडून लाखोंची बोली लावली जात आहे.

३५ खासगी मजूर नेमले: ‘सबमिशन’साठी बोली, एसीबी गप्प का ? यवतमाळ : दरमहा ३९ लाख रूपयांची उलाढाल असलेल्या पिंपळखुटीच्या सीमा वाहन तपासणी नाक्यावर ड्युटी मिळविण्यासाठी वाहतूक निरीक्षकांकडून लाखोंची बोली लावली जात आहे. हे सबमिशन दिल्यानंतरच येथील ड्युटीची संधी वरिष्ठांकडून दिली जाते. या चेक पोस्टवर वसुलीसाठी पिंपळखुटीतील ३५ खासगी मजूर कार्यरत आहेत. याशिवाय साहेबांच्या मर्जीतील पाच माणसांचीही येथे वर्दळ असते. याकडे यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे. पिंपळखुटी चेक पोस्टवर राज्यात येणारी वाहने आणि राज्यबाहेर जाणारी वाहने असे दोन नाके आहे. येथे स्वतंत्र वाहतूक निरीक्षकांची नेमणूक केली जाते. अकोला येथील एक अधिकारी, यवतमाळातून दोन, वाशिम एक आणि अमरावतीतील चार वाहतूक निरीक्षकांची आळीपाळीने ड्युटी लावली जाते. ही सायकल तोडून ड्युटी हवी असल्यास संबंधित अधिकाऱ्याला दुप्पट सबमिशन द्यावे लागते. यात डेप्युटीला तीन लाख, सहायकाला दीड लाख दिले जाते. या मार्गावरून जाणाऱ्या दहाचाकी वाहनाला २०० रुपये, १२ ते १४ चाकी वाहनाकडून ५०० रुपये, ट्रेलरकडून पाच हजार आणि बंद कंटेनर यातून मोठ्या प्रमाणात मासांची तस्करी केली जाते. त्यासाठी २५ हजार रुपये वसूल केले जातात. अधिकाऱ्यांच्या आठ तासाच्या ड्युट्या असल्यातरी ते मनमर्जीप्रमाणे सलग २४ ते ४८ तासापर्यंत ड्युटी करताना दिसतात. वसुलीचा सर्व कारभार खासगी पाच लोकांकडून केला जातो. त्यासाठी त्यांंना महिन्याकाठी २५ ते ३० हजार रुपये पगार देण्यात येतो. या व्यतिरिक्त पिंपळखुटीतील रोजंदारी दंडेवाल्या मुलांना २०० रुपये आणि एडीसी (पैसे वसूल करणाऱ्यांना) ५०० रुपये रोज दिला जातो. हे सर्व खासगी कर्मचारी दिवसाकाठी हजार ते पाच हजारापर्यंतचा वैयक्तिक गल्ला जमा करतात. या व्यतिरिक्त संपूर्ण आठ तासात किमान दहा ते पंधरा लाख रुपये गोळा होत असल्याचे सांगण्यात येते. याचे वाटप करताना डेप्युटीला ५० हजार, सहायकाला एक लाख व प्रादेशिकला एक लाख या प्रमाणे दिवसाकाठी वाटा दिला जातो. महिन्याकाठी येथे ३९ लाखांची उलाढाल होते. यात विविध क्षेत्रातील घटकांचा वाटा ठरलेला असतो. त्यात मोठा शेअर राजकीय पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा राहात असल्याचे सांगितले जाते. हा सर्व प्रकार राजरोस सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी) ‘सज्जन’ अधिकाऱ्याकडून रसदयवतमाळ डेप्यटी आरटीओ कार्यालयातच पदोन्नती मिळालेल्या सज्जन अधिकाऱ्याने ‘रंगेहात’ पकडले जाऊ नये म्हणून रसद पुरविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याच्या माध्यमातून महिन्याकाठी आठ ते नऊ लाखांचा गल्ला जात असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच पिंपळखुटी चेक पोस्टवर गेल्या काही वर्षात एकदाही ‘जाळे फेकले’ गेले नाही. काही महिन्यांपूर्वी जिल्ह्याबाहेरून रनिंग जाळ्याचा प्रयत्न केला गेला. मात्र तोही यशस्वी झाला नाही.