शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

डिक्कीतील ३५ लाखांचे सोने बचावले

By admin | Updated: July 12, 2015 02:35 IST

सराफा व्यावसायिकावर चाकू हल्ला करून लुटमार करताना अ‍ॅक्टीव्हाची डिक्की उघडण्यात चोरट्यांना अपयश आल्याने ३५ लाखांचे सोने बचावले.

चार किलो चांदी लुटली : सराफांना लुटणाऱ्यांचा सुगावाच नाही, दोन दुचाकी जप्तबाभूळगाव : सराफा व्यावसायिकावर चाकू हल्ला करून लुटमार करताना अ‍ॅक्टीव्हाची डिक्की उघडण्यात चोरट्यांना अपयश आल्याने ३५ लाखांचे सोने बचावले. मात्र चोरट्यांनी साडेचार किलो चांदी आणि गळ्यातील सोनसाखळी लंपास केली. शुक्रवारी रात्री घडलेल्या या लुटमार प्रकरणातील चोरट्यांचा अद्यापही सुगावा लागला नाही. पोलिसांनी दोन दुचाकी आणि लोखंडी रॉडसह इतर साहित्य जप्त केले. दरम्यान हल्ल्यात गंभीर जखमी सराफाची प्रकृती धोक्याबाहेर आहे.बाभूळगाव येथील सराफा व्यावसायिक सुधीर रोकडे आपले दुकान बंद करून शुक्रवारी रात्री घरी जात होते. ग्रामीण रुग्णालयासमोर अंधाराचा फायदा घेत चार चोरट्यांनी अडवून त्यांच्यावर चाकू हल्ला केला. त्यांच्याजवळील चांदी असलेली पिशवी आणि गळ्यातील सोनसाखळी घेऊन पळ काढला होता. प्रसंगावधान राखून सुधीरने आपल्या अ‍ॅक्टीव्हाची चाबी अंधारात फेकून दिली होती. त्यामुळे डिक्कीतील ३५ लाख रुपयांचे सोने बचावले. चोरट्यांनी डिक्की उघडण्याचा बराच प्रयत्न केला. त्यावेळी सुधीर यांनी प्रतिकार केला असता त्यांच्या डोक्यावर एक चोरट्याने लोखंडी रॉडने प्रहार केला त्यामुळे ते जमिनीवर कोसळले. सुर्दैवाने त्याच वेळी बाळू भालेराव आपल्या चारचाकी वाहनाने या परिसरातून जात होते. वाहनाच्या प्रकाशामुळे चोरटे पळून गेले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून एम.एच.२७-टी-१०१८ क्रमांकाची दुचाकी जप्त केली तर दुसरी दुचाकी एम.एच-२७-वाय - १८६९ करळगाव घाटातून जप्त करण्यात आली. तसेच लोखंडी टॉमी, मिरची पावडर, दोरी, आरी, एक शर्ट, पेंचिस-पाना, आगपेटी घटनास्थळाव आढळून आले. पोलिसांनी रात्रीच श्वानपथकाला पाचारण केले होते. या चोरट्यांनी करळगाव-सुकळी-यवतमाळ रस्त्यापर्यंतचा माग दाखविला. ५० च्यावर गावकऱ्यांनी आपल्या विविध वाहनांद्वारे रात्रभर चोरट्यांचा शोध घेतला. सोबतच बाभूळगाव पोलीस, ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पहाटेपर्यत चोरट्यांचा माग काढत होते. रात्री कळंब पोलिसांनीही नाकाबंदी केली होती. (प्रतिनिधी)लुटारूंची संख्या चार सराफा व्यावसायिक सुधीर रोकडे यांना लुटणाऱ्या चोरट्यांची संख्या चार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यातील तिघे जण कमी उंचीचे तर एक जण उंच असल्याची माहिती मिळाली. सुधीर आणि उमेश रोकडे या दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असून सराफा व्यावसायिकांनी आपली दुकाने शनिवारी बंद ठेवली होती. तपासासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके रवाना केली असून ग्रामस्थ आणि रोकडे यांची मित्रमंडळीही चोरट्यांचा शोध घेत आहे. पोलीस व राजकीय मंडळींनी ही बाब गांभीर्याने घेऊन पाऊले उचलावी, असे व्यापारी मंडळातर्फे प्रकाशचंद छाजेड यांनी सांगितले.