शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पोफाळीत तासाभरात अडीच लाख लोकवर्गणी

By admin | Updated: May 20, 2016 02:12 IST

पाणीटंचावर मात करण्यासाठी तालुक्यातील पोफाळी येथील तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्याच्या उपक्रमाला प्रारंभ झाला असून,

खासदारांचे श्रमदान : लोकसहभागातून तलावातून गाळ काढण्याचा उपक्रमउमरेखड : पाणीटंचावर मात करण्यासाठी तालुक्यातील पोफाळी येथील तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्याच्या उपक्रमाला प्रारंभ झाला असून, गुरूवारी हिंगोलीचे खा. राजीव सातव यांच्यासह शेकडो लोकांनी श्रमदान केले. त्याच वेळी अवघ्या तासाभरात अडीच लाख लोकवर्गणी गोळा झाली. पोफाळी परिसरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन गाळ उपसण्यास प्रारंभ केला. या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले. महिलांसह अनेक जण येथे श्रमदान करू लागले तर काही जणांनी आर्थिक मदतही दिली. गुरूवारी सकाळी ६ वाजता हिंगोलीचे खा. सातव अंबोना तलावावर आले. त्यांच्यासोबत माजी आमदार विजय खडसे, महिला बालकल्याण सभापती विमलताई चव्हाण उपस्थित होते. यावेळी खासदारांनी तब्बल दोन तास श्रमदान केले. त्यानंतर याच परिसरात उपस्थित सर्वांची बैठक घेतली. त्यावेळी शासन आणि खासदार फंडातून गाळ काढण्यासाठी मदत देणार असल्याचे सांगितले. यावेळी वसंतराव नाईक संस्थेचे कर्मचारी व संस्थाचालक विजय जाधव यांनी या उपक्रमासाठी ५१ हजाराची लोकवर्गणी दिली. तसेच पोफाळीच्या शिवाजी विद्यालातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी ५१ हजार रुपये दिले. तर युवा उद्योजक शंकर चव्हाण, रमेश चव्हाण, बळीराम चव्हाण यांनी प्रत्येकी २५ हजार तर अ‍ॅड़ युवराज देवसरकर यांनी २६ हजार, कैलास पवार यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिकांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे तासाभरात अडीच लाख रुपये गोळा झाले. या तालावातील काळ काढल्यामुळे पावसाळ््या साठवण क्षमता वाढून पाणीटंचाईवर मात होणार आहे. (शहर प्रतिनिधी)