शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तस्करीतील २५ जनावरे दगावली

By admin | Updated: March 30, 2017 00:10 IST

मध्यप्रदेशातून हैद्राबादच्या कत्तलखान्याकडे गुरांना घेऊन जाणारे दोन ट्रक ठाणेदार गुलाबराव वाघ व त्यांच्या

 जनावरांचे दोन ट्रक पकडले : पांढरकवडा पोलिसांनी केली कारवाई पांढरकवडा : मध्यप्रदेशातून हैद्राबादच्या कत्तलखान्याकडे गुरांना घेऊन जाणारे दोन ट्रक ठाणेदार गुलाबराव वाघ व त्यांच्या पथकाने राष्ट्रीय महामार्गावरील ढोकी या गावाजवळ पकडले असून ९० गुरांना जीवदान मिळाले आहे. पकडण्यात आलेल्या एका ट्रेलरमधील ६५ पैकी १५ जनावरे मृत्युमुखी पडली असून दुसऱ्या ट्रकमधील ५० पैकी १० जनावरे मृत्युमुखी पडली. मध्यरात्रीच्या सुमारास मध्यप्रदेशातून नागपुरमार्गे एक ट्रेलर व एका ट्रकमध्ये गुरे कोंबून हैद्राबादच्या कत्तलखान्याकडे जात असल्याची टीप ठाणेदार गुलाबराव वाघ यांना मिळाली. ठाणेदार वाघ, ए.पी.आय आनंद पिदुरकर, पी.एस.आय.शुभांगी मोहारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने राष्ट्रीय महामार्गावरील केळापूर या गावाजवळ आपला ठिय्या लावला. मध्यरात्रीच्या सुमारास नागपुरकडून भरधाव येणारा एक दहाचाकी कंटेनर व एक ट्रक भरधाव हैद्राबादकडे जाताना दिसला. या दोन्हीही ट्रकमध्ये गुरे असल्याचा संशय ठाणेदार वाघ यांना आला. त्यांनी या दोन्हीही ट्रकचा पाठलाग करुन दोन्हीही ट्रक ढोकी या गावाजवळ पकडले. यू.पी.२१ ए.एन.३३२१ क्रमांकाच्या दहाचाकी ट्रेलरमध्ये कोंबून भरण्यात आलेली ६५ जनावरे आढळून आली. त्यापैकी १५ जनावरे गुदमरुन मृत्युमुखी पडली होती. एम.पी.०९ एच.एफ.८१९१ या क्रमांकाच्या ट्रकमध्ये कोंबून भरण्यात आलेली ५० जनावरे आढळून आली असून त्यांपैकी १० जनावरांचा गुदमरुन मृत्यू झाला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दोन्हीही ट्रकचे चालक मात्र फरार झाले. पोलिसांनी दुसरे चालक आणून एक ट्रक वणी तालुक्यातील रासा येथे, तर दुसरा वडगाव जंगल येथे नेला. ठाणेदार वाघ व त्यांचे सहकारी अधिक चौकशी करीत आहे. (तालुका प्रतिनिधी) शिरपूरमध्ये २७ जनावरे पकडली नागपूर येथून ट्रक क्रमांक एम.एच.४०-वाय.४७३४ ने तेलंगणात कत्तलीसाठी नेण्यात येणारी २७ जनावरे शिरपूर पोलिसांनी वेळाबाई फाट्याजवळ पकडले. यातील एक बैैल मृत अवस्थेत होता. ठाणेदार सागर इंगोले यांना माहिती मिळताच बुधवारी पहाटे वेळाबाई फाट्याजवळ सापळा रचून २६ जनावरांची सुटका केली. या बैैलांची किंमत पाच लाख रूपये असून ट्रकसह पोलिसांनी १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी फिरोज खान रमजान खान (३०), रतीराम वखाराम राखेड (२७), अखतर अहेमद कुरेशी (२६), जुबेर सुभान शेख (२७) सर्व रा.नागपूर या तस्करांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास प्रकाश भगत करीत आहे.