शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरला १७ लाखांचा दंड

By admin | Updated: June 14, 2014 02:35 IST

बालरोग तज्ञाच्या निष्काळजीपणामुळे भूमिका सुजित राय या चिमुकलीला कायमचे अंधत्व आले.

यवतमाळ : बालरोग तज्ञाच्या निष्काळजीपणामुळे भूमिका सुजित राय या चिमुकलीला कायमचे अंधत्व आले. याप्रकरणी दोषी डॉक्टर आणि इन्श्युरन्स कंपनीने भूमिकाला १७ लाख ६१ हजार रुपयांचा मोबदला द्यावा, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने दिला आहे, अशी माहिती सुजित राय यांनी पत्रपरिषदेत दिली.वाघापूर परिसरात राहणारे सुजित रतनलाल राय यांच्या मुलीला ३१ नोव्हेंबर २०११ रोजी डॉ.संजीव लखनलाल जोशी यांच्या जोशी बाल रुग्णालय चिरायू चाईल्ड क्रिटीकेअर सेंटर येथे दाखल केले होते.मात्र उपचारात हयगय झाल्याने या मुलीला रोप हा कायमचं अंधत्व आणणारा आजारा झाला. हा आजार डॉ.संजीव जोशी यांच्या निष्काळजीपणामुळेच झाल्याचे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचापुढे सिद्ध झाले आहे. या खटल्यात डॉ.संजीव जोशी यांच्या बाजूने शहरातील नामांकित प्रसूती तज्ञांनी खोटी साक्ष दिली. तब्बल सात डॉक्टरांच्या साक्षी तपासण्यात आल्या. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच आणि राज्य ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच यांच्या विशेष सूचनेवरून दररोज या खटल्याची सुनावणी करण्यात आली. तब्बल ११ महिने २३ दिवस हा खटला चालला. गुरुवारी न्यायालयाने ६३ पानाचे निकालपत्र दिले. विशेष म्हणजे याच डॉक्टरच्या विरोधात फौजदारी न्यायालयातही खटला सुरू आहे. न्याय मंचाने भूमिकाच्या उपचारासाठी झालेला खर्च तीन लाख ६१ हजार ६०० रुपये, कायमचे अंधत्व आल्याने तिच्या संरक्षणासाठी ९ लाख रुपये, जीवनाचा आनंद उपभोगण्यापासून वंचित ठेवल्यामुळे पाच लाख रुपये असा दंड ठोठावला. यापैकी पाच लाख रुपये ओरिएंट इन्श्युरन्स कंपनी लि. यांनी द्यावे, असाही आदेश दिला आहे. या खटल्यात भूमिकाच्या बाजूने अ‍ॅड.विरेंद्र दरणे, अ‍ॅड. राजेश चव्हाण, अ‍ॅड. अमोल बोरखडे, अ‍ॅड. मनोज कारिया, अ‍ॅड. शुभांगी दरणे यांनी युक्तीवाद केल्याचे सुजित राय यांनी सांगितले. या पत्रपरिषदेला विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख संतोष ढवळे, भूमिकाची आई रोशनी राय उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)