शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

वणीत ९ तर आर्णीत १३ नामांकन दाखल

By admin | Updated: September 27, 2014 23:23 IST

वणी विधानसभा क्षेत्रासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शनिवारी शेवटच्या दिवशी एकूण नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आर्णी या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित मतदार संघात शेवटच्या दिवशी

वणी : वणी विधानसभा क्षेत्रासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शनिवारी शेवटच्या दिवशी एकूण नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आर्णी या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित मतदार संघात शेवटच्या दिवशी तब्बल १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. वणी विधानसभा क्षेत्रासाठी शनिवारी भाजपातर्फे संजीवरेड्डी बापूराव बोदकुरवार, राष्ट्रवादीतर्फे संजय नीळकंठ देरकर, बसपातर्फे राहुल पांडुरंग खापर्डे व अशोक बापूराव भगत, गोंगपातर्फे श्याम मारोती कोरवते, तर अपक्ष म्हणून राजेंद्र चिंतामण गोंडुलवार, शेख समीर शेख रफीक, महेंद्र देवराव पाटील आणि नारायण शाहू गोडे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापूर्वी वणी विधानसभा मतदार संघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शुक्रवारी लक्षवेधी मिरवणूक काढून राजू उंबरकर यांनी अर्ज दाखल केला होता. शुक्रवारीच मिरवणुकीने शिवसेनेतर्फे विश्वास रामचंद्र नांदेकर, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे वामनराव बापूराव कासावार यांनीही अर्ज भरला. यापूर्वी भारिप-बमसंतर्फे गीत घोष, अपक्ष म्हणून गणेश रामटेके, भाकपतर्फे अनिल घाटे, खोरीपतर्फे महादेव सिडाम, सिद्धार्थ सुखदेव नगराळे यांनी आंबेडकर पार्टी आॅफ इंडियातर्फे अर्ज दाखल केले होते. भाजपाचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी शनिवारी मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीततर्फे संजय देरकर यांनी नव्याने अर्ज दाखल करून त्यासोबत पक्षाचा शनिवारी एबी फॉर्म जोडला. आर्णीत शनिवारी १३ अर्जअनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या आर्णी विधानसभा मतदार संघासाठी शनिवारी तब्बल नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात राष्ट्रवादी, शिवसेना उमेदवारांचा समावेश आहे. आर्णी विधानसभा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे.या मतदार संघातून शुक्रवारी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे सामाजिक न्यायमंत्री अ‍ॅड.शिवाजीराव शिवराम मोघे, शिवसेनेतर्फे डॉ.विष्णू शंकर उकंडे, तर प्रदीप गंगाराम मसराम यांनी राष्ट्रवादी आणि अपक्ष म्हणून प्रत्येकी एक अर्ज दाखल केला. शनिवारी त्यात नऊ जणांची भर पडली. शनिवारी शिवसेनेतर्फे डॉ.संदीप प्रभाकर धुर्वे, भाजपातर्फे उद्धव चंपत येरमे व राजू नारायण तोडसाम, गोंगपातर्फे निरंजन शिवराम मसराम, राष्ट्रवादीतर्फे डॉ.विष्णू शंकर उकंडे, तर अपक्ष म्हणून अमोल सहदेव मंगाम, संभा दिलीप मडावी, हरिभाऊ कवडू पेंदोर, अनिल भावराव किनाके, रंजिता परशराम शिंदे, कृष्णा महादेव किनाके, अजय वसंत घोडाम व दत्तात्रय बापूराव सिडाम यांनी अर्ज दाखल केले. आता एकूण १0 उमेदवारांचे अर्ज या मतदार संघासाठी दाखल झाले. (कार्यालय प्रतिनिधी)