शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
3
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
4
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
5
विशेष लेख: उद्धव-राज आणि फडणवीस : काहीतरी 'मेख' आहे!
6
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
7
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
8
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
9
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
10
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
11
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
12
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
13
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
14
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
15
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
16
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
17
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
18
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
19
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर

१0 दिवसाआड पाणी

By admin | Updated: June 2, 2014 01:49 IST

गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. पावसाळ्यानंतरही अकाली पाऊस पडला.

गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. पावसाळ्यानंतरही अकाली पाऊस पडला. त्यामुळे यावर्षी दरवेळच्या तुलनेत पाणीटंचाईच्या झळा कमी बसल्या. पण आता वाढत्या उन्हाच्या तीव्रतेबरोबर येथील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्रपणे बसू लागल्या आहे.

आठ ते दहा दिवसाआड नळ योजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा २0 हजार लोकसंख्येच्या शहराला त्रस्त करत आहे. विहिरी, हातपंप, बोअरची पातळी खोल गेल्याने नागरिकांची पाण्यासाठी दिवसरात्र भटकंती वाढली आहे. घरात असेल ती लहान मोठी भांडीकुंडी घेवून आणि वाहन, सायकल, पायदळ पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. त्यातच कळमनेर येथील पाणीपुरवठा योजनेला लागू सक्तीचे भारनियमन, याशिवाय वेळोवेळी होणारे अतिरिक्त भारनियमन, वारंवार फुटणारी पाईपलाईन यामुळे नळयोजनेद्वारा होणारा पाणीपुरवठा बेभरवशाचा झाला आहे.

गेली अनेक वर्षांपासून कळमनेरला एक्स्प्रेस फिडरच्या माध्यमातून २४ तास वीज पुरवठा करण्याच्या केवळ बाता झाल्या. प्रत्यक्षात काहीच घडले नाही. परिणामी दर उन्हाळ्यात येथील नागरिकांच्या नशिबी पाण्यासाठी मारामारचे चित्र राहात आले आहे.

म्हणायला येथे ५५ लाख रुपये खर्च करून दोन-तीन वर्षांपूर्वी बांधलेली जलशुद्धीकरण यंत्रणा आहे. पण या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केल्यास सुरळीत आणि नियमित पाणी पुरवठा होत नाही. म्हणून कळमनेरवरून येथे थेट पाणीपुरवठा केला जातो. फिल्टर प्लांटचा उपयोग फक्त गांधी वॉर्ड, शांतीनगरकरिता होतो.

राळेगाव शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना शासनाद्वारे मंजूर झाली. लोकवर्गणीचा अर्धा हिस्सा नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भरला. पाईपलाईन व पाणीटाकीचे दोन वेगवेगळे टेंडरही काढण्यात आले. पाच-सहा महिन्यांपूर्वी ते मंजूरही झाले. परंतु जून महिना सुरू होत असताना प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. आगामी १५ दिवसात पाईपलाईन टाकण्याचे काम कंत्राटदारांनी युद्धस्तरावर केले तर पुढील काही महिन्यानंतर ही योजना कार्यान्वित होवू शकेल, अन्यथा पुढील वर्षापर्यंत लांबणार असे दिसते.

या दिवसात शेतशिवार, रस्ते खुले आहेत. तेथून आता पाईपलाईन टाकता येईल. पावसाळ्यात आणि पिके उभी झाल्यानंतर ते शक्य होणार नाही. विधानसभा उपाध्यक्ष तथा या क्षेत्राचे आमदार प्रा. वसंत पुरके यांच्यासमोर वेळेच्या आत ही कामे पूर्ण करून घेण्याचे आव्हान आहे.