शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पोटी येथील जि.प. शाळेचा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:39 IST

महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, त्यांच्यात महाराष्ट्राभिमान रुजावा आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अन्य बाबींचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे, या उद्देशाने ‘महाराष्ट्राची ...

महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, त्यांच्यात महाराष्ट्राभिमान रुजावा आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अन्य बाबींचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे, या उद्देशाने ‘महाराष्ट्राची गौरवगाथा’ या ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन १ ते १५ मे यादरम्यान करण्यात आले आहे. या उपक्रमात राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेचा निकाल जून महिन्यात जाहीर होणार असून, रोख पारितोषिक व प्रमाणपत्र, असे बक्षिसाचे स्वरूप आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या गौरवाशी निगडित ऐतिहासिक घटना, ठिकाणे, व्यक्ती, प्रसंग यावर आधारित भाषण, गाणे, नृत्य, चित्रकला आदींचा ३ ते ४ मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करावयाचा होता. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पोटी शाळेतील शिक्षकांनी व्हाॅटस्‌ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याची जबाबदारी पदवीधर शिक्षक शरद सुरसे यांनी पार पाडली. शाळेचे मुख्याध्यापक हिरामण म्हातारमारे, शिक्षक राजेंद्र ठोकळ, अनिल वाढणकर यांनी याकामी सहकार्य केले. केंद्रप्रमुख सुदाम भोंडणे, गटशिक्षणाधिकारी सुभाष पवणे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले.