शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या मालमत्तेबाबत जिल्हा परिषद अनभिज्ञ!

By admin | Updated: February 19, 2016 02:01 IST

स्थावर मालमत्तेचा लेखाजोखाच नाही; विभागप्रमुखांशी समन्वय साधणार.

संतोष वानखडे / वाशिमजिल्हा परिषदेच्या मालकीची स्थावर मालमत्ता, भूखंड कुठे आणि किती प्रमाणात आहेत, याची माहिती खुद्द जिल्हा परिषद प्रशासनालाच नसल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, स्थावर मालमत्तेचा शोध घेण्यासाठी लवकरच एक विशेष समिती गठित केली जाणार असल्याची माहिती आहे. त्याला मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दुजोरा दिला.ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेची निर्मिती १ जुलै १९९८ रोजी झाली. अकोला जिल्ह्यातून विभाजन झाल्यानंतर साहजिकच अकोला जिल्हा परिषदेची स्थावर मालमत्ता ही वाशिम जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित होणे आणि महसूल विभागाच्या कागदपत्रांवर तसा बदल होणे अ पेक्षित आहे; मात्र १७ वर्षानंतरही अनेक ठिकाणी महसूल विभागाच्या कागदपत्रांवर ह्यअकोला जिल्हा परिषदह्ण असा उल्लेख आढळतो. जिल्हा परिषदेची एकूण स्थावर मालमत्ता किती, याचा कोणताही लेखाजोखा जिल्हा परिषदेकडे नसल्याने अनेक ठिकाणी घोळ झाला आहे. जिल्हा परिषद मालह्य१च्या जागांवर अतिक्रमण झाले असून, वाशिम शहरातील काही जागा बळकाविण्याचा प्रयत्नही होत असल्याची चर्चा आहे. आरोग्य विभाग, शिक्षण, बांधकाम, पंचायत यासह अन्य विभागांच्या मालमत्ता किती आहेत, त्याची विद्यमान बाजारभावानुसार किंमत किती, या मालमत्तेचा वापर कोण करीत आहे, त्यावर कुणाची मालकी आहे, याबाबत कोणतीही निश्‍चित माहिती नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. १७ वर्षांंपासून चालत आलेल्या या पद्धतीत बदल करण्याचा प्रयत्न मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी चालविला असून, त्या दृष्टीने समिती गठित केली जाणार आहे.