वाशिम : सध्याचा काळ हा युवकांच्या बुध्दीची परिक्षा घेणारा आहे. स्पर्धेच्या या युगात नवनविन आव्हाने समोर येत आहेत. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर युवकांनी अधिकाधिक माहिती ग्रहण करुन आपली मेमरी अपडेट ठेवणे गरजेचे आहे, असा उपदेश युपीएससी परीक्षेतून आयएएस झालेल्या योगेश निरगुडे यांनी युवकांना केला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त माळी युवा मंच आणि सावित्री महिला व युवती मंचच्या २८ डिसेंबर रोजी स्थानिक बाकलीवाल शाळेत घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी योगेश निरगुडे यांनी स्पर्धा परीक्षेतील बारकावे विद्यार्थ्यांच्या निदर्शनात आणून दिले. स्पर्धा परीक्षेतील स्वत:चे अनुभव सांगून युवकांनी स्पर्धा परीक्षेकडे वळावे, असे आवाहनही निरगुडे यांनी केले. तुषार देवढे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. परिक्षेचे पर्यवेक्षक म्हणून गणेश बळीराम चोपडे, राजेश दशरथ भांदुर्गे, शाम जगन्नाथ महाजन यांनी काम पाहिले.
युवकांनो, स्पर्धेत टिकण्यासाठी अपडेट राहा
By admin | Updated: December 29, 2014 00:32 IST