शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

यंदा प्रथमच कोरडी पडली तपोवनची ‘बारव’!

By admin | Updated: May 20, 2017 01:42 IST

भाविकांमध्ये कुतूहल : जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता घटल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : पौराणिक महत्त्व प्राप्त असलेल्या जिल्ह्यातील तपोवन (ता.मालेगाव) येथील ‘बारव’ यापूर्वी कधीच कोरडी पडली नाही. मात्र, यंदाच्या उन्हाळ्यात ही ‘बारव’ आणि त्याला लागून असलेल्या विहिरीत थेंबभरही पाणी शिल्लक नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रामायण कालखंडात सीतेने तपोवनच्या ‘बारव’जवळ थांबून आंघोळ केली होती, अशी आख्यायिका असलेल्या मालेगाव तालुक्यातील तपोवनमध्ये महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. तेथे दर महाशिवरात्रीला तसेच श्रावण महिन्यात महिनाभर भाविकांची दर्शनासाठी अक्षरश: रीघ लागते. मंदिराला लागूनच पाण्याची मोठी ‘बारव’ आहे. त्यात स्नान केल्याने पुण्य मिळत असल्याची भाविकांची दृढ श्रद्धा आहे. मात्र, यावर्षीच्या उन्हाळ्यात सदर ‘बारव’मधील पाणी पूर्णत: आटले आहे. ही घटना यापूर्वी कधीच अनुभवली नाही, असे परिसरातील वयोवृद्ध मंडळी सांगतात. तथापि, पावसाळ्यात जमिनीवर कोसळणारे पाणी जमिनीत मुरण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत असल्याने जमिनीखालची पाण्याची पातळी घटत चालली आहे. त्यामुळेच ही स्थिती उद्भवल्याचा अंदाज भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक बलवंत गजभिये यांनी वर्तविला आहे.