शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीची परीक्षा तीन महिन्यांवर; अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:36 IST

कोरोनामुळे यंदा शैक्षणिक क्षेत्र प्रभावित झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गाचा ...

कोरोनामुळे यंदा शैक्षणिक क्षेत्र प्रभावित झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने २३ नोव्हेंबरपासून दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाले. कोरोनामुळे यंदा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्यात आला आहे. दरवर्षी अभ्यासक्रम पूर्ण व्हायला साधारणत: १० महिन्यांचा कालावधी दिला जात होता. यंदा कोरोनामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावित झाली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून वर्ग सुरू झाल्याने १० महिन्यांचा अभ्यासक्रम सहा महिन्यांत पूर्ण कसा होणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे.

००

दहावीचा अभ्यासक्रम

यंदा कोरोनामुळे दहावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला आहे. ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यात आले असले तरी गणित, विज्ञान हे विषय ऑनलाईन पद्धतीने समजून घेणे कठीणच आहे. कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत शिक्षकांसह विद्यार्थ्यांना करावी लागते.

००

बारावीचा अभ्यासक्रम

यंदा कोरोनामुळे बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला आहे. अभ्यासक्रम पूर्ण व्हायला साधारणत: सात, आठ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. नोव्हेंबर ते एप्रिल अशा सहा महिन्यांत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांची कसरत होणार आहे.

०००

कोरोनामुळे शिक्षणक्षेत्र जरी प्रभावित झाले असले तरी ऑनलाईन पद्धतीने सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले आहे. २३ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष वर्गात विद्यार्थ्यांना शिकविले जात आहे. विहित कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आले आहे.

- आर. बी. गरतकर,

प्राचार्य

०००

कोरोनाकाळात ऑनलाईन पद्धतीने अध्ययन-अध्यापन प्रक्रिया पार पडली आहे. यावर्षी अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली आहे. दहावी, बारावीचा अभ्यासक्रम जवळपास पूर्ण होत आला आहे. कमी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल.

- नेल्सन वर्गीस,

मुख्याध्यापक,

०००

यंदा कोरोनामुळे शिक्षणक्षेत्र प्रभावित झाले आहे. ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यात आले. परंतु, गणित व विज्ञान हे विषय प्रत्यक्ष शिकविल्यामुळेच चांगले स्मरणात राहतात. कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत आहे. -गाैरव चव्हाण, विद्यार्थी

००

तीन महिन्यांवर परीक्षा आल्या आहेत. दरवर्षी बारावीचा अभ्यासक्रम साधारणत: जून ते फेब्रुवारी या महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. यावर्षी अभ्यासक्रम पूर्ण व्हायला कमी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची कसरत होत आहे. -मनीष जाधव, विद्यार्थी