रिसोड : पंधरा दिवसापासून विविध मागण्यासाठी ग्रामसेवकांनी पुकारलेल्या संपामुळे तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतीचे विकासात्मक कामे खोळंबले आहे. तालुक्यामध्ये ८१ ग्रामपंचायतीसाठी ५९ ग्रामसेवकाची नियुक्ती आहे. यामध्ये ४ ग्रामसेवक कंत्राटीनुसार नियुक्त आहे. ते संपामध्ये सामील नाहीत तर ४ ग्रामसेवक रजेवर गेले आहे. संपामध्ये ५९ पैकी ५१ ग्रामसेवकाचा समावेश आहे. यामध्ये ८ ग्रामविकास अधिकारी आहेत. एकंदरीत ४३ ग्रामसेवक व ८ ग्रामविकास अधिकारी संपावर गेल्यामुळे त्यांच्या संलग्नीत ग्रामपंचायतीमधील सर्व कामे ठप्प झाली आहे. संपामुळे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे संदर्भात सन २0१४-१५ करीता आमंत्रित गावकृती आराखडा प्रस्ताव पुनत: रखडले आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे कामे मंजूर झाले नाही. संपामुळे गावातील पांदन रस्ते, विहिरीचे कामे ब्लिचिंग पावडर, गावातील अंतर्गत रस्त्याची डागडुजी आदी महत्वपूर्ण कामे प्रलंबित आहे. पंचायत समितीच्यावतीने गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि. २ व १६ तारखेला ग्रामसभा आयोजित असते. या संपामुळे सभेला खो मिळाला आहे. पावसाळा लांबणीवर पडल्यामुळे गावातील पाणी टंचाईसंदर्भात माहितीचे प्रस्ताव संपूर्णत: प्राप्त झाले आहे. विशेष घटक योजनेअंतर्गत असलेले प्रस्ताव संपामुळे लटकले आहे. ग्रामपातळीवरील रस्ते, नाल्या, पथदिवे, रहिवासी दाखले, जागा खरेदी विक्रीसाठी ८ अ, पाणीपुरवठा संदर्भात अडथळे निरसण, मासिक सभा आदी कामे संपामुळे प्रभावीत झाले आहे. ग्रामविकासात्मक कामाचा टप्पा अपूर्ण राहिला आहे. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता २८ जूनला संपली आणि १ जुलैपासून ग्रामसेवकांनी संपाचा झेंडा रोवला आहे. आचारसंहिता व संप यामुळे या आर्थिक वर्षात विकास कामाचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये विद्यार्थी व शेतकर्यांचे सर्वाधिक नुकसान होत आहे.
शेतकरी व विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका
By admin | Updated: July 14, 2014 23:30 IST